आपल्या सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग्ज मिळतात याची तुम्हाला नक्कीच कल्पना असेल. पूर्वी कारमध्ये एकच एअरबॅग मिळत होती. कालांतरानं दोन एअरबॅग्स कारमध्ये देण्यात येऊ लागल्या. त्याच वेळी, आता अनेक कंपन्यांनी 6 किंवा त्याहूनही अधिक एअरबॅग वापरण्यास सुरुवात केली आहे. एअरबॅगच्या मदतीने गाडीचा प्रवास सुरक्षित होतो. मात्र, दुचाकींचा विचार केला तर सुरक्षिततेची चिंता संपलेली नाही. दुचाकींच्या सीटवर एअरबॅग्ज बसविण्याबाबत संशोधन केले जात आहे. यासोबतच असे जॅकेटही तयार केले जात आहे जे अपघाताच्या वेळी एअरबॅगप्रमाणे तुमचे संरक्षण करेल. दरम्यान, आता हेल्मेटमध्ये एअरबॅग्ज बसवल्याची बातमी समोर आली आहे. इटालियन कंपनी एरोह अशा हेल्मेटसाठी तंत्रज्ञान तयार करत आहे. ते आल्यानंतर दुचाकी चालवणे अधिक सुरक्षित होईल.
एरोहने एअरहेड नावाचे नवीन हेल्मेट सादर केले आहे, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे या हेल्मेटमध्ये अशा एअरबॅग्ज असतील जे गरजेच्या वेळी उघडतील आणि रायडरच्या डोक्याला खोल दुखापत होण्याची शक्यता कमी करेल. हेल्मेटचा बाहेरचा भाग अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे की उघडल्यानंतरही डोके हलवायला भरपूर जागा असेल आणि रायडरला जास्त दबाव जाणवणार नाही. म्हणजेच अपघातानंतर तुमच्या डोक्याला किंवा चेहऱ्याला दुखापत होण्याची शक्यता नगण्य असेल. तथापि, या हेल्मेटच्या फीचर्स संबंधित जास्त माहिती किंवा त्याचं लाँच आणि किंमतीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तथापि, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की ते पुढील वर्षी लाँच केले जाऊ शकते.
भारतात BIS सर्टिफिकेशन हेलमेट आवश्यकमोटार वाहन कायद्यानुसार, मोटारसायकल किंवा स्कूटरवर हेल्मेट स्ट्रीप न घातल्यास 1000 रुपयांचा दंड घेतला जाऊ शकतो. त्याच वेळी, तुमच्या हेल्मेटला बीआयएस (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) प्रमाणपत्र नसले किंवा सदोष असले तरीही 1000 रुपयांची पावती फाडली जाऊ शकते. अशाप्रकारे हा दंड 2 हजार रुपये होतो. या नवीन नियमामुळे हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांना या मानकावर हेल्मेट तयार करावे लागणार आहे. या नियमानुसार हेल्मेटचे वजन १.२ किलो असावे. वाहतूक मंत्रालयानुसार नॉन आयएसआय मानक हेल्मेट विकणे हा गुन्हा आहे.