शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

'ड्रिंक अँड ड्राइव्ह' करताय? तर सावधान, आता कार स्वत:हून बंद पडणार आणि स्पीडवरही नियंत्रण येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 1:02 PM

मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांमागील एक प्रमुख कारण आहे.

मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांमागील एक प्रमुख कारण आहे. बहुतेक देशांमध्ये मद्यपान करुन गाडी चालवल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, परंतु सर्वत्र त्याची अंमलबजावणी करणं सोपं नाही. पण जर तुमची कार स्वतःच तुम्हाला दारूच्या प्रभावाखाली गाडी चालवण्यापासून थांबवत असेल तर? तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य आहे. नवी कार अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये ड्रायव्हर डिटेक्शन सिस्टीम आणि अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टीम सारख्या तंत्रज्ञानाचाही समावेश असणार आहे. अशा तंत्रज्ञानामुळे आपल्या देशात मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या रस्ते अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं.

अमेरिकेतील प्रत्येक कारमध्ये असणार ही टेक्नोलॉजी2020 मध्ये अमेरिकेत दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे ११,००० हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळेच अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (NTSB) सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टम बसवण्यास सांगितलं आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये डॉज एसयूव्ही आणि फोर्ड एफ-150 ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत सात मुलांसह एकूण नऊ जण ठार झाले होते.

अपघात रोखण्यासाठी होणार मदतNTSB अधिकारी जेनिफर होमंडी यांनी कारमधील तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितलं. या तंत्रज्ञानामुळे भीषण अपघात टाळता येण्यासारखे आहेत. अमेरिकेत दरवर्षी खराब ड्रायव्हिंग आणि वेगामुळे होणारे हजारो अपघात टाळता आले असते, असं होमंडी यांचं म्हणणं आहे. 

भारतातही होणार फायदाभारतात 2020 मध्ये सुमारे 8,300 मृत्यू मद्यपान करुन गाडी चालवल्यामुळे झाले आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे, वेगात वाहन चालवणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे, वळण समजू न शकणं आणि बेजबाबदारपणे रिव्हर्सिंग ड्रायव्हिंग यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, अल्कोहोल इम्पेअरमेंट डिटेक्शन सिस्टीमचाही वापर केला तर असे रस्ते अपघात कमी होऊ शकतात.

गाडी आपोआप थांबणारअल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टम ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरील हावभावांचे निरीक्षण करतं. मद्यधुंद ड्रायव्हरचे हावभाव ओळखून हे तंत्रज्ञान आपलं काम सुरू करतं आणि जोरात अलार्म वाजू लागतो. हे तंत्रज्ञान हळूहळू वाहनाचा वेग कमी करतं आणि वाहन थांबवतं. सध्या या तंत्रज्ञानात आणखी सुधारणा करण्याचं काम सुरू आहे.

टॅग्स :Automobileवाहनalcohol prohibition actदारुबंदी कायदा