मारुती सुझुकीने आपली सर्वाधिक खपाची अल्टो के१० ही छोटी कार काही दिवसांपूर्वीच लाँच केली होती. आता या कारचे सीएनजी व्हेरिअंटही लाँच करण्यात आले आहे. यामुळे मारुतीच्या ताफ्यात आला एक दोन नाही तर १३ सीएनजी कार झाल्या आहेत.
अल्टो के10 एस-सीएनजी ही कार व्हीएक्सआय व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. मारुतीने आतापर्यंत दहा लाखांहून अधिक सीएनजी कार विकल्या आहेत. ऑल-न्यू अल्टो अल्टो के10 एस-सीएनजीमध्ये नेक्स्ट-जेन के-सीरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन देण्यात आले आहे. जीएनजी मोडमध्ये 41.7 kW (56.69PS++)@5300RPM चे पीक पॉवर आउटपुट आणि 82.1Nm@3400RPM चा टॉर्क देते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.
एल्टो के १० सीएनजीमध्ये 33.85 km/kg चे मायलेज देते. म्हणजेच चांगले प्रेशर असेल तर १० किलो सीएनजीमध्ये कार २५० ते ३०० किमीचे अंतर कापेल. या अल्टोची १६ देशांत विक्री केली जाते. सर्वात महत्वाची म्हणजे All-New Alto K10 S-CNG किंमत VXI S-CNG 5,94,500 एवढी ठेवण्यात आली आहे.
सध्या मारुतीच्या ताफ्यात अल्टो, अल्टो के10, एस - प्रेसो, वॅगनआर, ईको, सेलेरिओ, स्विफ्ट, डिझायर, अर्टिगा, बलेनो, एक्सएल6, सुपर कॅरी आणि टूर एस सह एकूण 13 एस - सीएनजी मॉडेल्स आहेत.