इलेक्ट्रीक टू-व्हीलरच्या बाजारात धमाका करणाऱ्या ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीला स्कूटर रस्त्यावर येण्याआधीच जोरदार धक्का बसला आहे. एकीकडे ओलाच्या स्कूटर सांगितलेल्या वेळेत डिलिव्हर करण्यात कंपनीला अपयश आलेले आहे. ही डिलिव्हरी जवळपास दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच Ola Electric च्या क्वालिटी हेडने राजीनामा दिल्याने धक्का बसला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ओलाचे क्वालिटी हेड जोसेफ थॉमस यांनी वर्षभरापूर्वीच कंपनी जॉईन केल्याचे या घडामोडींशी संबंधीत लोकांनी सांगितले आहे. आधीच स्कूटरची डिलिव्हरीस उशिर होत असताना त्यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
थॉमस यांनी रेनो इंडियामधून ओलामध्ये जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी गेली ११ वर्षे पार्ट प्रोग्रॅम, मॅनेजमेंट आणि कार्पोरेट क्वालिटी हेड म्हणून काम केले होते. त्यापूर्वी ते 9 वर्षे फोर्ड मोटर्समध्ये काम पाहत होते. मनी कंट्रोलने थॉमस यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिले आहे. ओलाने थॉमस यांच्या राजीनाम्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू ओलामधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओला सुरक्षा आणि क्वालिटी विभागासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शोधात असल्याचे समजते. थॉमस जाण्याआधी ओलाला ही भरती करायची आहे.
ओला इलेक्ट्रीक ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना स्कूटरची डिलिव्हरी करण्यास सुरवात करणार होती. परंतू, ओलाला यात अपयश आले आहे. नोव्हेंबरची मुदत देऊन आता डिसेंबरपासून डिलिव्हरी सुरु करणार असल्याचे कंपनी सांगत आहे. यामुळे डिलिव्हरी जवळपास दोन महिन्यांनी पुढे गेली आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हरी करण्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने 1200 कोटींच्या स्कूटर विकल्या गेल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ओलाने स्कूटरची टेस्ट राईड सुरु केली आहे.
संबंधित बातम्या...
OLA Electric Bike: ओलाची इलेक्ट्रीक बाईकही येणार; स्वस्त स्कूटरवरही काम सुरु