देशातील कार बाजारात मार्च 2024 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-10 कारच्या यादीत टाटा पंच ही पहिल्या क्रमांकावर आहे. हिची किंमत 6.13 लाख रुपयांपासून सुरू होते. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ह्युंदाई क्रेटाचा, तिसऱ्या क्रमांकावर आहे मारुती वॅगनआर, चौथ्या क्रमांकावर मारुती डिझायर, पाचव्या स्थानावर मारुती स्विफ्ट, सहाव्या स्थानावर मारुती बलेनो, सातव्या क्रमांकावर महिंद्रा स्कॉर्पिओ, आठव्या क्रमांकावर मारुती अर्टिगा, नवव्या स्थानावर मारुती ब्रेझा, तर दहाव्या स्थानावर टाटा नेक्सॉन आहे.
महत्वाचे म्हणजे, Tata Punch, Mahindra Scorpio आणि Maruti Ertiga च्या विक्रीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 61%, 72% आणि 65% ने वाढ झाली आहे. तसेच, मारुती स्विफ्ट, मारुती बलेनो आणि टाटा नेक्सॉनची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 10%, 4% आणि 5% ने कमी झाली आहे. या शिवाय, वार्षिक आधारावर Creta विक्री 17% ने आणि Dezire ची विक्री 19% ने वाढली आहे. तर WagonR ची विक्री 5% आणि Brezza ची विक्री 10% ने कमी झाली आहे.
मार्च महिन्यातील टॉप-10 कार -टाटा पंच - 17,547 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 61% ची वाढ)हुंडई क्रेटा - 16,458 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 17% ची वाढ)मारुती वॅगनआर - 16,368 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 5% ची घट)मारुती डिझायर - 15,894 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 19% ची घट)मारुती स्विफ्ट - 15,728 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 10% ची घट)मारुती बलेनो - 15,588 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 4% ची घट)महिंद्रा स्कॉर्पिओ - 15,151 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 72% ची वाढ)मारुती अर्टिगा - 14,888 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 65% ची वाढ)मारुती ब्रेजा - 14,164 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 10% ची घट)टाटा नेक्सॉन - 14,058 यूनिट्सची विक्री (गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 5% ची घट)