शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सिंगल चार्जमध्ये 120 KM धावणारी AMO Electric Bikes ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 1:35 PM

AMO Electric Bikes launches electric scooter Jaunty Plus : कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 120 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. यासोबतच या स्कूटरची बॅटरीही चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. 

नवी दिल्ली : AMO Electric Bikes च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Jaunty Plus ची प्रतीक्षा अखेर संपली. कंपनीने सोमवारी ही स्कूटर लाँच केली. कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 120 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. यासोबतच या स्कूटरची बॅटरीही चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. 

जाणून घ्या, स्कूटरची किंमत (Jaunty Plus Electric Scooter Price) या इलेक्ट्रॉनिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये आहे. तसेच, या इलेक्ट्रॉनिक स्कूटरमध्ये 60 V/40 Ah च्या लिथियम बॅटरी बसवण्यात आली आहे.

इतर फीचर्सक्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टीम (ई-एबीएस), अँटी थेफ्ट अलार्म आणि मजबूत चेसिससह Jaunty Plus स्कूटर बाजारात आणली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, साइड स्टँड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाईट्स आणि इंजिन किल स्विच यांसारख्या फीचर्सचाही समावेश आहे.

काय म्हणाले कंपनीचे संस्थापक?AMO Electric Bikes चे संस्थापक आणि एमडी सुशांत कुमार यांनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चिंगबाबत सांगितले की, या स्कूटरचे प्लॅनिंग आणि डिझाइनिंग कंपनीच्या आर अँड डी टीमने केले आहे. तसेच, या इको-फ्रेंडली बाइक्स दाखवतात की, त्यांचा ब्रँड सर्वोत्कृष्ट ईव्ही मोबिलिटी सोल्यूशन आणि सेवा प्रदान करण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असेही सुशांत कुमार म्हणाले.

इलेक्ट्रिक-वाहनांची वाढती क्रेझदरम्यान, सुशांत कुमार हे या स्कूटरच्या लॉन्चबद्दल खूप उत्सुक आहेत. तसेच, या इलेक्ट्रिक स्कूटर्स 15 फेब्रुवारीपासून 140 डीलरशिपवर उपलब्ध होतील असे कंपनीने म्हटले आहे. ही नवीन स्कूटर लॉन्च केल्याने भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक-वाहनांची वाढती क्रेझ दिसून येते. हे कंपन्यांना अधिक नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी प्रेरित करते.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर