शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नवीन EV स्कूटर लॉन्च; कश्मीर ते कन्याकुमारी झालेली चाचणी, 136 km रेंज, पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 4:24 PM

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हिलर मार्केटमध्ये आणखी एका EV स्कूटरची एन्ट्री झाली आहे.

Ampere Nexus Electric Scooter : भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हिलर मार्केटमध्ये आणखी एका स्कूटरची एन्ट्री झाली आहे. Greaves Electric Mobility Pvt Ltd ने आपली दमदार Ampere Nexus भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतीय रस्त्यांवर दीर्घकाळापासून चाचणी सुरू होती. विशेष म्हणजे, ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याने काश्मीर ते कन्याकुमारी, हा प्रवास केला आहे. 10 हजार किलोमीटर ऑन रोड चाचणीनंतर कंपनीने ही स्कूटर लॉन्च केली. या स्कूटरची किंमत 1,09,900 रुपये(एक्स-शोरुम) आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे मेड इन इंडिया आहे.

Ampere Nexus मध्ये काय खास आहे?Ampere Nexus इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बेस्ट इन-क्लास हायब्रिड स्विंग आर्म आणि ट्विन सस्पेंशन, यूनिक एअर कूल आर्किटेक्चरसह बेस्ट-इन-क्लास एअरोडायनॅमिक्स, Nex.Armor ने सुसज्ज पॉवरफुल डिझाइन आणि मजबूत चेसिस, स्मार्टसेंस टेक्नॉलजीने सुसज्ज 7 इंच टीएफटी टचस्क्रीन, डायमंड कट हेडलँप, आर्कटिक टर्न इंस्पायर्ड टेललँप्स, लायटवेट अॅल्यूमिनियम ग्रॅब हँडलने सुसज्ज मोठी सीट मिळेल. कंपनीने गेल्या महिन्यात या स्कूटरची बुकिंग सुरू केली होती. आता 15 मे पासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल.

या रंगांमध्ये उपलब्धAmpere Nexus ला Janskar Aqua, Indian Red, Lunar White आणि Steel Grey, अशा 4 आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kWh LFP बॅटरी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या बॅटरीची 30 टक्के अतिरिक्त लाइफ आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 4 किलोवॅटची पीक पॉवर जनरेट करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही घरच्या वीजेने 3 तास 22 मिनिटांत फुल चार्ज करू शकता. Ampere Nexus ची बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यावर 136 किलोमीटरची रेंज मिळते. स्कूटरचा टॉप स्पीड 93 किमी प्रतितास आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर