नवी दिल्ली : भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच हवेत उडणारी कार बनविणार आहे. जपानी सहयोगी कंपनी सुझुकीच्या मदतीने ही कार तयार केली जाईल. या वाहनास ‘इलेक्ट्रिक एअर कॉप्टर’ (ईएसी) असे म्हटले जाते. ईएसी वाहन हे ड्रोनपेक्षा मोठे मात्र हेलिकॉप्टरपेक्षा छोटे असते. पायलटसह कमीत कमी ३ प्रवासी त्यात बसू शकतील. ते घराच्या छतावरून उड्डाण व लँडिंग करू शकेल.
उबर व ओला कारप्रमाणेच ईएसी वाहने हवाई टॅक्सी म्हणून वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतील. सुझुकी मोटारच्या जागतिक वाहन नियोजन विभागाने हवाई कारच्या परवानग्या मिळविण्यासाठी हवाई वाहतूक नियामक ‘डीजीसीए’सोबत चर्चा सुरू केली आहे.
पुढील वर्षी प्रदर्शन ?मारुती सुझुकीने या प्रस्तावित ईएसीला ‘स्कायड्राइव्ह’ असे नाव देण्याचे ठरविले आहे. हे वाहन जपानमधील २०२५ च्या ओसाका एक्स्पोमध्ये प्रदर्शित होऊ शकते. लक्ष्यित मार्केट जपान व अमेरिका असले तरी ‘मेक इन इंडिया’तून याचे उत्पादन भारतात होईल.