मोडिफाइड वाहनांचे (Modified Vehicles) फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही सोशल मीडियावर असाच एक फोटो शेअर केला आहे, जो सर्वाधिक चर्चेत आहे. हा फोटो एका जीपचा आहे, जी महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये बदल करून तयार करण्यात आली आहे. ट्विटरवर या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे.
महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटर हँडलवरून (Twitter Handle) हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच, मेघालयातील जोवई (Jowai) येथे राहणार्या माईया रिंबाई (Maia Rymbai) यांनी ही अनोखी जीप तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. फोटो शेअर करताना महिंद्रा ट्रॅक्टर्सने लिहिले की, 'मेघालयच्या Maia Rymbai यांनी हे सिद्ध केले आहे की टफ सुद्धा कूल होते. आम्हाला 275 एनबीपीची ही मोडिफाइड पर्सनालिटी आवडली आहे.'
ही अनोखी क्रिएटिव्हिटी पाहून आनंद महिंद्रा स्वतःला रोखू शकले नाहीत. महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी लिहिले, 'हा एक विचित्र दिसणारा प्राणी आहे, परंतु तो डिस्ने अॅनिमेटेड चित्रपटातील गोंडस पात्रासारखा दिसतो.' महिंद्राच्या ट्रॅक्टरचा हा अवतारही यूजर्सना खूप आवडला आहे. एका यूजरने रिप्लायमध्ये लिहिले की, हा ग्रेट खलीचा अधिकृत ट्रक असावा.
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट करत असतात. मोडिफाइड ट्रॅक्टरशिवाय त्यांनी येझ्डीचा जुना फोटोही शेअर केला आहे. एक दशक जुना येझ्डीचा फोटो पोस्ट करत, एका युजर्सने लिहिले की, तो जुना अल्बम शोधताना सापडला. हे शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की आठवणी, भावना आणि आनंद…त्यामुळेच तो येझ्डी सारख्या प्रतिष्ठित ब्रँडला पुनरुज्जीवित करत आहे. दरम्यान, महिंद्राच्या कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात येझ्डी आणि जावा सारख्या जुन्या मोटरसायकल ब्रँड्सना नवा लुक देऊन पुन्हा लॉन्च केले आहे.