लाखाच्या बाता मारणाऱ्या ओलाने गेल्या दोन महिन्यांत काही हजारच गाड्या विकल्या आहेत. त्यापैकी कित्येक जणांना एक ना अनेक समस्या येत आहेत. कोणाला १०० किमीची देखील रेंज मिळत नाहीय, तर कोणाला स्कूटरची फिनिशिंगच चांगली मिळालेली नाही. काहींना तर ५-१० किमी स्कूटर चालविल्यावर कंपनीला टो करून नेण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागली आहे. तीन चार दिवसांपूर्वी तर अजबच परंतू धोकायदायक प्रकार घडला आहे. ओला स्कूटरचा मालक नॉर्मल मोडवर असताना पडला आहे.
या ग्राहकाने ट्विटरवर स्कूटरच्या समस्येचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यानंतर अनेकांनी ही समस्या असल्याचे म्हणत आपापल्या तक्रारी पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी ओला स्कूटरची बिल्ड क्वालिटीच ठीक नसल्याचे म्हटले आहे. मलय मोहापात्रा नावाच्या व्यक्तीने ही रिव्हर्स गिअरची तक्रार केली आहे. त्याने ही स्कूटर नॉर्मल मोडमध्ये सुरु केली होती, जेव्हा त्याने स्कूटरचा अॅक्सिलेटर वाढविला तेव्हा अचानक स्कूटर रिव्हर्स मोडमध्ये गेली. स्कूटरने अचानक वेग घेतला आणि जोरात मागे जाऊ लागली व तोल जाऊन पडली. जेव्हा तो पडला तेव्हा त्या स्कूटरच्या स्पीडोमीटरवर 102 kmph एवढा प्रचंड वेग दिसला होता.
मोहापात्रा यांनी यामुळे छोटा अपघात झाल्याचे म्हटले. स्कूटर तेव्हा चढणीला होती. आताही जेव्हा स्कूटर नॉर्मल मोडमध्ये म्हणजेच पुढे जाण्याच्या मोडमध्ये असते तेव्हा ती आपोआप रिव्हर्स जायला लागते, अशी तक्रार त्यांनी केली आहे. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
काही इतर ग्राहकांनादेखील आहेत या सारख्या समस्येचा सामना करावा लागला. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे रीडिंग अदलाबदल होत असताना स्कूटरना समस्या येत आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर रिव्हर्स मोडसाठी “R” दाखवत आहे परंतू स्कूटर आपोआप पुढे जात आहे आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर उलट जात असताना स्कूटरचा वेग दाखवत आहे.