शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

जगज्जेती Apple नव्या क्षेत्रात, इलेक्ट्रीक कार येणार; ह्युंदाई, कियाला बसला जबरदस्त 'धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 1:59 PM

Apple's new electric car: नवीन वर्षाच्या सुरुवातीला Apple ही जगविख्यात स्मार्टफोन आणि गॅजेट निर्माती कंपनी नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा होती. ती आता खरी ठरली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला Apple ही जगविख्यात स्मार्टफोन आणि गॅजेट निर्माती कंपनी नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा होती. ती आता खरी ठरली आहे. नवीन इलेक्ट्रीक कारसाठी अ‍ॅपल ह्युंदाई मोटर्ससोबत करार करणार आहे. ह्युंदाई अ‍ॅपलच्या कार बनविणार असल्याचे आता नक्की झाले आहे. (World class Apple inc. entering in Automobile Sector of Electric cars with Hyundai and Kia motors collaboration.)

या डीलमुळे ह्युंदाईला सुखद धक्का बसला आहे. ह्युंदाईच्या शेअरमध्ये 20 टक्के वाढ पहायला मिळाली आहे. ह्युंदाईने सांगितले की, अ‍ॅपलसोबतची चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तर दुसरीकडे काही मीडियांनी दावा केला आहे की, 2027 मध्ये दोन्ही कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहेत. 

अ‍ॅपल इनसायडरच्या रिपोर्टमध्ये टीएफ सिक्युरिटीजचे अ‍ॅनालिस्ट मिंग ची कुओ यांच्या हवाल्याने ह्युंदाई ही सुरुवातीची कंपनी असणार असल्याचे म्हटले आहे. तर यानंतर अ‍ॅपल अमेरिकन कंपनी जनरल मोटर्स आणि युरोपियन कार निर्माता कंपनी पीएसएसोबत मिळून कार बनविणार आहे. 

कियाची घेणार मदतअ‍ॅपलची पहिली कार ह्युंदाईच्या E-GMP इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्मवर बनविण्यात येणार आहे. ह्युंदाई मोबिस या कारचे पार्ट डिझाईन आणि उत्पादन करणार आहे. तर ह्युंदाईची सबसिडरी कंपनी किया मोटर्स अ‍ॅपल कारचे अमेरिकेत उत्पादन सुरु करणार आहे. अ‍ॅपल आणि कियाने 3.5 अब्ज डॉलरची डील केल्याचे देखील सांगितले जात आहे. यानुसार किया जॉर्जियामध्ये प्लँट उभारणार आहे. जेथे 2024 पासून दरवर्षी 1 लाख कारचे उत्पादन घेतले जाणार आहे. हळूहळू ते वाढून चार लाखांवर उत्पादन घेतले जाणार होते.

Apple च्या iPhone 13 मध्ये असणार डीएसएलआर कॅमेराचे फिचर; मोठ्या कंपनीला मिळाले कंत्राट

E-GMP प्लॅटफॉर्म गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. यावर नवीन पिढीची BEV (बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल) मॉडेल बनविणार आहे. 2021 मध्ये Ioniq 5 सह कियाच्या अन्य कारही बाजारात येणार आहेत. या प्लॅटफॉर्मच्या कार या 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 100 किमीची रेंज देऊ शकणार आहेत. तसेच कारची रेंज ही 500 किमी असणार आहे. चार्जिंग कॅपॅसिटीदेखील एवढी असणार आहे की, 18 मिनिटांत 80 टक्के बॅटरी चार्ज होणार आहे. 

ऑटोविषयक अन्य बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :Apple IncअॅपलHyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कार