भारतीय बाजारात सध्या ईलेक्ट्रीक कारचे मार्केट जोरात आहे. जागतिक बाजारातही पुढचे वर्ष इलेक्ट्रीक गाड्यांनाच मागणी असणार असा अंदाज लावला जात आहे. परंतू,अद्याप जगातील सर्वात मोठी कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी या सेगमेंटकडे न वळता हायब्रीड गाड्यांवर जोर देत आहे. याचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
निमशहरी, ग्रामीण भागातही अनेक जणांकडे ईलेक्ट्रीक कार घेण्याएवढा पैसा आहे, परंतू ते तिकडे वळत नाहीएत. याचे एकमेव कारण म्हणजे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या ग्राहकांना ईलेक्ट्रीक कारऐवजी स्ट्राँग हायब्रिड कार सोईस्कर वाटत आहेत. शहरात टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या अनेक ठिकाणी लोकांना ईलेक्ट्रीक कार सोईच्या वाटत आहेत. तर ग्रामीण भागात ज्यांचे बंगले आहेत, त्यांना पेट्रोल, डिझेलवरील किंवा हायब्रिड कार सोईची वाटत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्ट्राँग हायब्रिड कारना मागणी वाढत आहे. अर्थात या कार काही स्वस्त नाहीएत परंतू या कारचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे या कार चार्जिंग करण्याची आवश्यकता नसते. कारण ती इंधन आणि बॅटरी अशा दोन्ही गोष्टींवर चालतात. यामुळे या कार चांगल्या मायलेज देत आहेत.
ईलेक्ट्रीक कारचा पर्याय हे हायब्रिड कार होऊ शकत नाहीत. कारण ईव्ही प्रदुषण करत नाहीत. उलट हायब्रिड कार पेट्रोल जाळते. दुसरा पाहिला जात असलेला फायदा म्हणजे ईलेक्ट्रीक कारच्या किंमतीपेक्षा हायब्रिड कारच्या किंमती कमी आहेत. हे दोन फायदे पाहून या कंपन्या ईलेक्ट्रीक कारच्या क्षेत्रात तातडीने येण्याचे टाळत आहेत.