Bridgestone India Guinness World Records: ब्रिजस्टोन इंडियानं असा विक्रम केला आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. ब्रिजस्टोननं टायर्सच्या मदतीनं सर्वात मोठा लोगो तयार करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. ब्रिजस्टोन इंडियाच्या ३०० हून अधिक कर्मचार्यांनी ५६५ टायर्सच्या मदतीनं ब्रिजस्टोन लोगो तयार करत जागतिक विक्रम केला. ही टायरची सर्वात मोठी इमेज असल्याचा दावा देखील करण्यात आला.
ब्रिजस्टोनच्या या सर्वात मोठ्या टायरचा लोगो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स एडजुडिकेटर्सद्वारे प्रमाणित करण्यात आलाय. हा विक्रम डिझाइनमध्ये वापरलेल्या एकूण टायर्सच्या संख्येवरून मोजला जातो आणि इमेज किंवा लोगो तयार करण्यासाठी सर्वाधिक टायर्स वापरल्याबद्दल ब्रिजस्टोन इंडियाला पुरस्कार देण्यात आलाय.
जागतिक विक्रम प्रस्थापित करणं हा कंपनीसाठी एक मैलाचा दगड आहे. याचा आम्हाला अभिमान असून यासाठी संपूर्ण टीमनं कष्ट घेतले असल्याची प्रतिक्रिया ब्रिजस्टोन इंडियाचे एमडी स्टेफानो सचिनी यांनी म्हटलं. “हा रेकॉर्ड कंपनीची प्रतिष्ठा दर्शवतो. ५६५ टायर्स असलेल्या सर्वात मोठ्या टायर इंसिग्नियासाठी नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल टीमचे अभिनंदन करतो,” अशी प्रतिक्रिया गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे ऑफिशिअल एडज्युरिकेटर स्वप्निल डांगरिकर यांनी दिली. ही कंपनी एसयूव्ही, कार, व्यावसायिक वाहने आणि ट्रकसाठी टायर टायर्सचं उत्पादन करते.