देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने (Royal Enfield), गेल्या 6 महिन्यांपूर्वी देशांतर्गत बाजारात आपली सर्वात स्वस्त बाईक हंटर 350 लाँच केली. या बाईकने बाजारात उतरताच जबरदस्त कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, या बाईकला ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ 6 महिन्यांतच या बाईकच्या तब्बल 1 लाख युनिट्सची विक्री झाली, असा दावा कंपनीने केला आहे. या बाईकची खासियत म्हणजे, तिचे पॉवरफुल इंजिन आणि किफायतशीर किंमत, कंपनीने ही बाईक केवळ 1.50 लाख रुपये एवढ्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे.
हंटर 350 जे-प्लेटफॉर्मवर बेस्ड आहे, यावरच क्लासिक 350 आणि Meteor 350 देखील तयार करण्यात आली आहे. कंपनीने या रोडस्टर बाईकला टियरड्रॉप-शेप फ्यूल टँक आणि सर्क्युलर हेडलॅम्प दिला आहे. याशिवाय या बाईकला राउंड शेप इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि स्टायलिश अलॉय व्हील आणि शॉर्ट एक्झॉस्ट (Silencer) देखील देण्यात आले आहे.
खरे तर, कंपनीने ही बाईक यंगस्टर्सना डोळ्यासमोर ठेऊन तयार केली आहे. या बाईकला 349cc क्षमतेचे सिंगल सिलिंडर असलेले इंजिन देण्यात आले आहे. जे 20.2 BHP ची जबरदस्त पॉवर आणि 27 Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने जोडण्यात आले आहे. हेच इंजिन रॉयल एनफील्डच्या इतर 350 सीसी बाईक्समध्येही दिसून येते.
Hunter 350 चे व्हेरिअंट्स आणि किंमत - व्हेरिअंट्स - किंमत (एक्स-शोरूम)Hunter 350 Retro - 1,49,900Hunter 350 Metro - 1,66,901Hunter 350 Metro Rebel- 1,71,900