शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

सायकल चोरी झाली म्हणून  YouTube वर शिकून बनवली Anti-Theft E-Cycle

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 3:19 PM

Anti-Theft E-Cycle Innovation : या सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न करताच, सायकल मालकाच्या फोनवर मेसेजसह अलार्म अॅक्टिव्हेट होईल.

नवी दिल्ली : टॅलेंटला कोणत्याही पदवीची गरज नसते. सामान्य लोकही अनेकदा असे काम करतात, ज्याचा जगाला अभिमान वाटतो. असाच काहीसा प्रकार आसाममधील  (Assam) करीमगंज येथील रहिवासी सम्राट नाथ याने केला असून त्याने थेफ्ट प्रूफ ई-सायकल (Anti-Theft E-Cycle) बनवल्याचा दावा केला आहे. या सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न करताच, सायकल मालकाच्या फोनवर मेसेजसह अलार्म अॅक्टिव्हेट होईल.

बरेच लोक आपले आवडते व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी यूट्यूब ( YouTube) वापरतात. मात्र यूट्यूबवरून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून 19 वर्षीय सम्राट नाथ याने बनवलेल्या सायकलची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सायकलवर नियंत्रण ठेवण्यासाठी सम्राटने अॅपही तयार केले आहे. सम्राट दावा करतो की, तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून त्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

कल्पना कशी सुचली?इयत्ता आठवीत शिकत असताना त्याच्या मामाची सायकल चोरीला गेली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या चोरीमुळे संपूर्ण कुटुंब हादरले. तेव्हापासून सम्राटाच्या मनात एकच गोष्ट चालू होती की असे डिव्हाइस बनवू, जेणेकरून सायकल चोरीपासून वाचू शकेल. त्यानंतर त्यानंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेतला आणि या डिव्हाइसवर काम सुरू केले.

शानदार फीचर्सया खास ई-सायकलचे फीचर्स देखील जबरदस्त आहेत. यामध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. ते तीन तासात चार्ज होते. दरम्यान, आपले स्वप्न साकार झाल्यानंतर सम्राट म्हणतो की, एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर सायकल तुम्हाला 60 किलोमीटरपर्यंत थांबू देणार नाही. या अँटी थेफ्ट डिव्हाईसचे (Anti-theft Device) सर्किट बनवण्यासाठी सम्राटला यूट्यूबवर खूप संशोधन केल्यानंतर सुरुवातीचे यश मिळाले होते. त्यासाठी तो कोडिंगही शिकला, पण पैशांची कमतरता त्याच्या यशाच्या मार्गात पुन्हा अडथळा ठरत होती. 

यानंतर सम्राटाने मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करून आपल्या शोधासाठी पैसे वाचवण्यास सुरुवात केली. पगारातून मिळालेल्या पैशातून त्याने एक साधी सायकल विकत घेतली आणि तिचे रूपांतर एका विलक्षण अँटी थेफ्ट ई-सायकलमध्ये (Anti-Theft E-Cycle) केले. आता सायकलचे पेटंट घेतल्यानंतर सम्राटला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे आहे. जेणेकरून लोकांना ही उत्तम सायकल परवडणाऱ्या किमतीत बाजारात मिळू शकेल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAutomobileवाहन