नवी दिल्ली : एथर एनर्जी (Ather Energy) कंपनी मोठ्या बॅटरी पॅकसह नवीन स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गेल्या महिन्यात आपली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 S लाँच केली होती. आता येत्या काळात, Ather 540s HR मोठ्या बॅटरी पॅकसह येऊ शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
एथर इलेक्ट्रिक स्कूटर लाइन-अपमधील बदलामागील संपूर्ण कल्पना या वर्षाच्या सुरुवातीला FAME 2 सबसिडीमध्ये मोठी कपात केल्यानंतर स्कूटर अधिक परवडणारी बनवण्याचा प्रयत्न करणे हा होता. एथरचा उपाय म्हणजे आपल्या सध्याच्या 450 एक्सला 3.7kWh बॅटरी पॅक किंवा लहान 2.9kWh पॅकच्या निवडीसह ऑफर करणे होता.
मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, एथर आपल्या लाइनअपमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यास तयार असल्याचे एका डॉक्युमेंट्समध्ये म्हटले आहे. तसेच, कंपनी हाय रेंज इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
एंट्री लेव्हलमध्ये येतेय 'ही' स्कूटर Ather 450 S ही एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर आहे, यात 2.9 kWh बॅटरी पॅक आहे. जेणेकरून ग्राहक योग्य किमतीत एथर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतील. Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटरने एथरची सिग्नेचर डिझाईन राखून ठेवली आहे, त्यात कर्व्ही फ्रंट काउल, LED हेडलॅम्प आणि स्लीक LED टेललाइट आहे, अगदी Ather 450X प्रमाणे देण्यात आले आहे.
बॅटरी पॅक आणि रेंजAther 450x पेक्षा ते अधिक परवडणारे बनवण्यासाठी, त्याचे डिजिटल स्पीडोमीटर थोडे वेगळे केले आहे. Ather 450 S मध्ये टचस्क्रीन डिस्प्ले उपलब्ध नाही. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑपरेट करण्यासाठी, बटणांच्या खाली एक जॉयस्टिक दिली जाते, ज्याद्वारे तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नियंत्रित करू शकता. तसेच, Ather 450 S 2.9 kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, जे 7.24 bhp आणि 22 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 115 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. जर तुम्ही फक्त इको मोडमध्ये गाडी चालवली तर तुम्हाला 90 किमीची खरी रेंज मिळेल.