Ather Electric Scooters : नवी दिल्ली : पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता लोक आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याला जास्त पसंती घेत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या आपल्या वाहनांवर भरघोस सूट देत आहेत. दरम्यान, Ather इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळणाऱ्या सवलतींबद्दल माहिती जाणून घेऊया. या सवलतींमध्ये तुम्हाला Ather 450X आणि Ather 450s वर 24000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील.
Ather इलेक्ट्रिक स्कूटरवर हे बेनिफिट्स मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही अट पूर्ण करावी लागणार नाही. हे बेनिफिट्स तुम्हाला डायरेक्ट मिळतील. Ather च्या Ather 450X आणि Ather 450s स्कूटरवर तुम्हाला एकूण 24000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला 5000 रुपयांचे इलेक्ट्रिक डिसेंबर बेनिफट, 12000 रुपयांचे EMI व्याज बचत आणि 7000 रुपयांचे बॅटरी प्रोटेक्शन बेनिफिट्स मिळतील. हे सर्व मिळून तुम्हाला Ather स्कूटरवर एकूण 24000 रुपयांचा फायदा मिळेल.
Ather 450X चे स्पेसिफिकेशनया Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.29 लाख रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला 6kw इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 3.7kwh लिथियम आयन बॅटरी पॅकसह जोडलेली आहे, जी 26Nm टॉर्क जनरेट करते. Ather 450X च्या रेंजबद्दल सांगायचे तर, या स्कूटरमध्ये तुम्हाला एका चार्जमध्ये 146 किलोमीटरची रेंज मिळते. तसेच, स्कूटरमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डॅश आहे, ज्यामध्ये तुम्हाला बॅटरी, स्पीड, मायलेज आणि इतर माहिती मिळते.
Ather 450s चे स्पेसिफिकेशनया Ather 450s स्कूटरमध्ये 2.9kwh बॅटरी आहे, जी 5.4kw मोटरला जोडलेली आहे. तसेच, ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 115 किमीची रेंज देते. Ather कंपनीचा दावा आहे की, नवीन 450S फक्त 3.9 सेकंदात 0-40 किमी/ताचा वेग वाढवू शकते आणि 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी 6 तास आणि 36 मिनिटे लागतात. Ather च्या ग्रिड फास्ट चार्जरचा वापर करून 450S देखील चार्ज केले जाऊ शकते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.29 लाख रुपये आहे.