शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Ather 450X Base Model: १ लाखापेक्षा कमी किंमतीत Ather इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; पाहा किंमत, मिसिंग फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 4:02 PM

Ather 450X Base Model: एथर ४५० सीरिजमध्ये एक नवं व्हेरिअंट लाँच करण्यात आलं आहे. या मॉडेलची किंमत एक लाखांपेक्षा कमी आहे.

Ather 450X Base Model: एथर एनर्जीनं (Ather Energy) भारतीय बाजारात आपली परवडणारी इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर Ather 450X चं बेस व्हेरिअंट आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत एक लाखांपेक्षा कमी आहे आणि याद्वारे कंपनी ओला एस1 आणि ओला एस1 एअर ग्राहकांना आकर्षित करू इच्छित आहे. Ather 450X सीरिज स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 98,183 ते 1.28 लाखांदरम्यान आहे. दरम्यान, या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध नाहीत, जी टॉप व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत. पाहूया काय आहे या नव्या स्कूटरमध्ये.

एथर एनर्जीनं 450X इलेक्ट्रीक स्कूटरचं बेस मॉडेल 98,079 रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) लाँच केलं आहे. या मॉडेल लाइनअपसह प्रोपॅक देखील ऑफर करण्यात आला आहे आणि ज्यांना आपल्या स्कूटरमध्ये ते बसवायचे आहे त्यांना 30,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. या पॅकेजमध्ये फास्ट चार्जिंगसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. आता Ather 450X च्या बेस वेरिएंटच्या फीचर्स बाबत सांगायचं झालं तर त्यात अनेक फीचर्स काढण्यात आली आहेत. जीपीएस नेव्हिगेशन, राइड मोड्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, लाइव्ह ट्रॅकिंग, हिल होल्ड असिस्ट आणि पार्क असिस्ट यांसारखे फीचर्स त्यात मिळत नाहीत. याशिवाय त्यात ओटीए अपडेट्सदेखील मिळणार नाहीत.

किती असेल रेंज?Ather 450X च्या बेस व्हेरिएंटमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन मिळतो, परंतु त्यात बेसिक ग्रेस्केल इंटरफेस आहे. टॉप व्हेरियंटमध्ये मल्टी कलर डिस्प्ले उपलब्ध आहे. एथरच्या या स्वस्त स्कूटरमध्ये सिंगल राइड मोड उपलब्ध आहे. याशिवाय यात 3.7kWh ची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. फुल चार्जनंतर ही स्कूटर 146km ची रेंज देऊ शकते. ही इलेक्ट्रीक स्कूटर 6.4kW ची पिकअप पॉवर आणि 26Nm चा टॉर्क जनरेट करते. 90kmph चा टॉप स्पीड असलेली ही इलेक्ट्रीक स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 15 तासांपेक्षा जास्त वेळ घेते. म्हणूनच कंपनी यामध्ये प्रोपॅक देत आहे, ज्यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा मिळेल.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड