ईलेक्ट्रीक वाहनांची मागणी सध्या वाढू लागली आहे. कारपेक्षा स्कूटरना जोरदार मागणी असल्याचे ओला आणि सिंपल वनच्या स्कूटरच्या बुकिंगच्या आकड्यावरून दिसले आहे. या दोन कंपन्यांना तुफान प्रतिसाद मिळाल्याने नव्या, जुन्या कंपन्या आता नव्या स्कूटर आणत आहेत. ओला आणि सिंपल वनच्या दणक्यामुळे एथर एनर्जीदेखील (Ather Energy) परवडणारी ई स्कूटर आणणार आहे. याच दोन कंपन्यांकडून एथरला कडवी टक्कर मिळणार आहे. (Ather Energy to rival Ola S1, Simple One with new Rs 1 lakh electric scooter.)
ओलाने एस१ आणि एस२ या दोन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. तर सिंपल एनर्जीने सिंपल वन ही ई स्कूटर लाँच केली. या दोन्ही हाय रेंज स्कूटर आहेत. यामुळे एथरच्या विक्रीवर याचा परिणाम जाणवणार आहे. याचसोबत हिरो मोटोकॉर्प आणि सुझुकीदेखील नव्या ई-स्कूटर विकसित करत आहेत.
एका नव्या रिपोर्टमधील दाव्यानुसार बेंगळुरुच्या ईव्ही स्टार्टअपने भारतीय बाजारासाठी नवीन ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याचे ठरविले आहे. याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षाही कमी असणार आहे. असे झाल्यास ही भारतातील सर्वात स्वस्त एथरची स्कूटर बनेल. ही स्कूटर राज्य आणि केंद्रांच्या सबसिडीनंतर 80 ते 90 हजार रुपयांना उपलब्ध होईल.
Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...
एथरची ही नवीन स्कूटर ओला आणि सिंपल वनलाच नाही तर होंडा अॅक्टिव्हा, टीव्हीएस ज्युपिटर आणि सुझुकी अॅक्सेसच्या विक्रीलाही प्रभावित करू शकते. नवीन स्कूटर एथर 450 प्लॅटफॉर्मवरच असणार आहे. कंपनी सध्या दोन मॉडेल विकत आहे. 450 प्लस आणि 450 एक्स अशी ही दोन मॉडेल आहेत. या स्कूटरची किंमत 1.13 लाख आणि 1.32 लाख आहेत. नवीन स्कूटर 2023 च्या पहिल्या तिमाहीत येऊ शकते. परंतू तोवर खूप उशिर झालेला असेल. कारण पुढील दीड-दोन महिन्यांत ओला आणि सिंपल वनची विक्री सुरु होईल.