Ather-Hero Partnership for Charging Station: देशातील EV गाड्यांची वाढती मागणी पाहता Ather आणि Hero MotoCorp एकत्र आले आहेत. देशात चार्जिंग स्टेशनचे (Fast Charging Station) नेटवर्क वाढवण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. Hero MotoCorp ची इलेक्ट्रिक उपकंपनी Vida ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. दोन्ही कंपन्या देशात फास्ट चार्जिंग स्टेशनची (Fast Charging Station) संख्या वाढवण्यार भर देतील.
100 शहरांमध्ये 1900 स्टेशन उपलब्ध होणारया भागीदारीद्वारे इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना Vida आणि Ather ग्रिड वापरण्याची सुविधा मिळेल. याद्वारे देशातील 100 शहरांमध्ये 1900 चार्जिंग पॉइंट बनवले जातील.
BIS ने स्वदेशी चार्जिंग स्टेशनला मान्यता दिलीभारतीय मानक ब्युरो (BIS) ने अलीकडेच लाइट इलेक्ट्रिक कम्बाइंड चार्जिंग सिस्टम (LECCS) ला मंजुरी दिली आहे. BIS द्वारे मंजूर केलेले हे देशातील पहिले AC आणि DC चार्जिंग कनेक्टर आहेत. हे चार्जिंग ग्रिड हलके इलेक्ट्रिक वाहने सहज चार्ज करू शकतात.
हे चार्जिंग पॉइंट्स वापरण्यासाठी ग्राहकांना माय विडा किंवा एथर अॅपवर नेव्हिगेशन मिळेल. या अॅप्सद्वारे ग्राहकांना त्यांच्या जवळच्या चार्जिंग पॉइंटची माहिती मिळेल. यामुळे ग्राहकांना त्यांची इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणे सोपे जाईल.