सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक कार्सची मागणी वाढताना दिसत आहे. अशातच एका दिग्गज प्लेअरची एन्ट्री लवकरच होणार आहे. जर्मनीतील प्रमुख लग्झरी वाहन उत्पादक कंपनी Audi आपलं पहिलं इलेक्ट्रीक वाहन Audi e-tron लाँच करणार आहे. कंपनीनं सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती दिली आहे. 22 जुलै रोजी ही कार भारतात लाँच होईल.
यापूर्वी जागतिक बाजारपेठेत Audi च्या ईलेक्ट्रीक कार्स यापूर्वीपासूनच उपलब्ध आहेत. परंतु भारतीय बाजारपेठेत Audi e-tron ही कंपनीची पहिलीच कार असेल. ही कार मर्सिडिज, जॅगुआरसारख्या कार्सना टक्कर देणार आहे. या कारचं बुकींग लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
जागतिक बाजारपेठेत Audi e-tron या कारला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच या कारची विक्रीची चांगली झाली आहे. 2020 या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये या कारच्या 17,641 युनिट्सची विक्री करण्यात आली होती. गेल्या वर्षीच कंपनीनं या कारला एक अपडेटही दिलं होतं. यामध्ये सेकंड ऑनबोर्ड चार्जर आणि 71.2 kWh क्षमतेची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. ही कार भारतात बॉडी स्टाईल एसयूव्ही आणि स्पोर्टबॅकमध्ये लाँच केली जाईल. एसयूव्ही मॉडेल हे पहिल्यांदा लाँच केलं जाणार.
काय असतील फीचर्स?Audi e-tron मध्ये सिंगल फ्रेम ग्रिल, एलईडी डीआरएलसोबतच मॅट्रिक्स एलईडी हेडलँप आणि स्पोर्टबॅकवर रूफ लाईन देण्यात आली आहे. तर रिअर प्रोफाईलमध्ये रॅपराऊंड एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहे. याशिवाय बम्परला ड्युअल टोन ट्रिटमेंटही मिळतं. याशिवाय दोन अन्य व्हेरिअंटमध्ये कंपनीनं निराळी बॅटरी क्षमता आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
Audi e-tron 55 QuatroAudi e-tron 55 Quatro व्हेरिअंट 168hp आणि 247 nM टॉर्क जनरेट करतं. तर बुस्टर मोडसह ते 402hp आणि 66nm टॉर्क जनरेट करतं. या एसयूव्हीचा टॉप स्पीड 200 किलोमीटर प्रति तास आहे. WLTP सायकलनुसार युरोपमध्ये ही एसयूव्ही सर्वाधिक 365 ते 436 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.