Audi ने लोकप्रिय लक्झरी Q5 SUV चे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. जर्मन कंपनीने लेटेस्ट एसयूव्ही कारचे स्पेशल एडिशन भारतीय बाजारात ६७.०५ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केले आहे. लक्झरी एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल सध्याच्या लेटेस्ट तंत्रज्ञानाच्या ट्रिमवर आधारित आहे, परंतु काही एक्सटेरिअर अपडेट्ससह आणि विशेष किंमतीत अॅक्सेसरीज पॅकेजसह कार लॉन्च करण्यात आली आहे. स्पेशल एडिशनमध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल नाही. ऑडी Q5 स्पेशल एडिशनच्या फक्त निवडक कारच विक्रीसाठी उपलब्ध असतील. लक्झरी SUV च्या फिचर्सची माहिती जाणून घेऊयात.
ऑडी Q5 स्पेशल एडिशनच्या फक्त मोजक्याच कार विक्री केल्या जाणार आहेत. लेटेस्ट लक्झरी कारची किंमत ८४,००० रुपयांनी वाढली आहे. स्पेशल एडिशन दोन एक्सक्लुझिव्ह एक्सटीरियर पेंट शेड्ससह सादर करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना डिस्ट्रिक्ट ग्रीन आणि आयबिस व्हाइट शेड्स मिळतील. याशिवाय नवीन रंग अधिक चांगले दिसण्यासाठी ब्लॅक स्टाइलिंग पॅकेजही देण्यात आलं आहे. यात विंग मिररसाठी ब्लॅक-आउट फिनिश, ग्रिल आणि टेल गेटवर ऑडी लोगो, रूफ रेलसाठी नवीन ग्रेफाइट फिनिश आणि ५ स्पोक व्हील यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.
ऑडी Q5: अॅक्सेसरीज पॅकेज ऑफरजर्मन ऑटो कंपनीने ऑडी Q5 स्पेशल एडिशनच्या इंटीरियरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याशिवाय उपकरणांच्या बाबतीत अपग्रेडेशन मिळालेले नाही. पण लक्झरी कार ब्रँडने विशेष किमतीत अॅक्सेसरीज पॅकेजही देऊ केलं आहे. यामध्ये रनिंग बोर्ड आणि चांदीच्या ऑडी रिंग फॉइलचा समावेश आहे. अॅक्सेसरीज पॅकेजची किंमत किती आहे आणि ती एक्स-शोरूम किंमतीपेक्षा जास्त आहे की नाही हे सध्या ऑडीने स्पष्ट केलेलं नाही.
Audi Q5 Special Edition: फीचर्सऑडी Q5 स्पेशल एडिशनमध्ये टेक्नॉलॉजी ट्रिमच्या टॉप व्हेरियंट प्रमाणेच वैशिष्ट्ये आहेत. यात पॅनोरामिक सनरूफ, मेमरीसह पॉवर फ्रंट सीट्स, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, अॅम्बियंट लाइटिंग, १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3-इंच ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट, पार्किंग एड प्लस आणि ८ एअरबॅग्ज यांसारखी उत्कृष्ट फिचर्स आहेत. ऑडी Q5 स्पेशल एडिशन मर्सिडीज-बेंझ GLC, BMW X3, लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट आणि व्होल्वो XC60 सारख्या लक्झरी कारशी स्पर्धा करते.
Audi Q5 Special Edition: स्पेसिफिकेशन्सऑडीने सध्याच्या मॉडेलप्रमाणे Q5 स्पेशल एडिशनमध्ये २.० लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिनची शक्ती वापरली आहे. हे इंजिन ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देण्यात आलं आहे. यात ऑडीची क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम देखील मिळेल. ग्राहकांना ६ मोडसह अॅडॉप्टिव्ह सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट यांसारख्या वैशिष्ट्यांचाही लाभ घेता येईल.