(Image Credit : Navbharat Times)
नवी दिल्ली : Audi इंडियाने RS6 Avant Performance ही सुपरकार अधिकृतरित्या भारतात लॉन्च केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची चर्चा रंगली होती. चला जाणून घेऊ या कारची खासियत...
RS6 Avant Performance मध्ये ४.० लिटर, वी८ इंजिन देण्यात आलं आहे. नॉर्मल मॉडेलच्या तुलनेल या कारचं आऊटपूट वाढवून ६०५ हॉर्स पॉवर आणि टॉर्क ७५० न्यूटन मीटर केलं आहे. स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत हे ४५ एचपी आणि ५० एनएम अधिक आहे. या कारच्या इंजिनाला ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आलाय.
स्पीड
Audi RS6 Avant Performance ही कार ० ते १०० किमीचा स्पीड ३.७ सेकंदात पकडते. या कारची टॉप स्पीड २५० किमी प्रति तास आहे.
नवीन फ्रंट व्हिल ग्रील
Audi RS6 Performance Avant मध्ये नवीन फ्रंट ग्रील, अपडेटेड बंपर, २१ इंच अलॉय व्हिल्स आणि मागे नवीन डिफ्यूजर दिलं आहे.
किंती आहे किंमत?
नवी दिल्लीच्या एक्स-शोरुममध्ये या कारची किंमत १.६५ कोटी रुपये इतकी आहे. जर्मन कंपनी ऑडीने २०१५ मध्ये RS6 Avant स्टॅंडर्ड मॉडल पहिल्यांदा लॉन्च केली होतं. तीन वर्षांनी या कारचं परफॉर्मन्स व्हर्जन आणलं गेलं आहे.