ऑटो एक्स्पो आजपासून सुरू झाला आहे. या एक्स्पोवर कोरोना व्हायरसचा धोका आहे. चीनच्या काही कंपन्या यंदा भारतात पदार्पण करणार असल्याने त्यांनी एकूण 20 टक्के जागा आरक्षित केलेली आहे. असे असताना भारताची सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी मोठ्या तयारीनिशी या एक्स्पोमध्ये उतरणार आहे. बीएस ६ मानकांमुळे मारुतीसह जवळपास सर्वच कंपन्यांना नवीन इंजिनच्या गाड्या लाँच कराव्या लागणार आहेत. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड एक्स्पोमध्ये नवीन सीएनजी आणि हायब्रिड कार लाँच करणार आहे. तसेच काही फिचर कारही असणार आहेत. मारुतीने मिशन ग्रीन थीम ठरविली असून या एक्स्पोमध्ये त्याचीच झलक पहायला मिळणार आहे. 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने कन्सेप्ट फ्युचर एस दाखविली होती. यंदाच्या एक्स्पोमध्ये मारुती नवीन डिझाईन लाँच करणार आहे. कदाचित ही कार इलेक्ट्रीक असण्याची शक्यता आहे. या कारचे नाव कन्सेप्ट फ्युचुरो ई असेल. ही कार एसयुव्ही कुपेसारखी असण्याची शक्यता आहे. कारण मारुतीने या कारचे डिझाईन पोस्ट केले आहे. मारुतीची एकमेव 4 स्टार असलेली कार व्हिटारा ब्रेझाने 2016 पासून भारतातील सर्वाधिक खपाची एसयुव्ही असल्याचा मान मिळविलेला आहे. या कारचे फेसलिफ्ट येणार आहे. यामध्ये इंजिन बदलासह आतून आणि बाहेरूनही बदल पहायला मिळणार आहेत.
मारुती या एक्स्पोमध्ये एकाचवेळी 17 गाड्या लाँच करणार आहे. यामध्ये इग्निस फेसलिफ्ट, सेलेरिओ, एस-प्रेसो, वॅगन आर, स्विफ्ट, डिझायर, बलेनो, इर्टिगा, एस-क्रॉस, सियाझ एस, एक्सएल ६ यासह स्विफ्टचे हायब्रिड मॉडेलही असणार आहे.
मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज
यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच
स्विफ्ट ही हायब्रिड कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 10 किलो वॉट इलेक्ट्रीक जनरेटर युनिट, फाईव्ह स्पीड एएमटी असणार आहे. ही कार 91एचपी ताकद देते. महत्वाचे म्हणजे या कारचे मायलेज 32 किमी आहे.