2023 च्या ऑटोएक्स्पोच्या वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. टाटाच्या पॅव्हेलिअनमध्य़े काय असेल ते आपल्याला समजले आहेच पण मारुतीच्या पॅव्हेलिअनमध्ये काय असेल याची उत्सूकता अनेकांना लागून राहिली आहे. मारुती सुझुकी एक दोन नाही तर १६ कार दाखविणार आहे.
Auto Expo: ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणारमारुतीच्या पॅव्हेलिअनमध्ये तीन नवीन एसयुव्ही असणार आहेत. यामध्ये जिम्नी ५ डोअर, एक सब -४ मीटर कूप एसयुव्ही आणि एक इलेक्ट्रीक एसयुव्ही कॉन्सेप्ट कार असणार आहे. नवी कूप एसयुव्ही आणि जिम्नी एप्रिल आणि ऑगस्टमध्ये लाँच केली जाणार आहे.
मारुतीची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही जी टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरविली जाणार आहे. ही एसयुव्ही २०२५ मध्ये लाँच होणार आहे. मारुती २०२३ च्या उत्सवांच्या तोंडावर नवीन ७ सीटर एमपीव्ही लाँच करू शकते. नवीन मारुती 7-सीटर MPV हे ब्रँडचे पहिले री-बॅज केलेले टोयोटाचे मॉडेल असेल. नुकत्याच लाँच केलेल्या इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असणार आहे.
MPV 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 9 स्पीकर JBL साउंड सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, मेमरी फंक्शनसह पॉवर ड्रायव्हर सीट, ऑटोमन फंक्शनसह इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल दुसरी-रो सीट, पॅनोरॅमिक ऑफर करण्याची शक्यता आहे. सनरूफ आणि बरेच काही असेल. तसेच अडासची ही पहिली मारुतीची कार असेल. नवीन मारुती एमपीव्हीचे उत्पादन टोयोटाच्या बिदाडी प्लँटमध्ये केले जाणार आहे. ही मारुतीची सर्वात महागडी कार असेल. प्रीमियम उत्पादन असल्याने, ते Nexa डीलरशिप नेटवर्कद्वारे विकले जाईल.