- चिन्मय काळेनॉयडा :वाहनांचे प्रदूषण कळीचा मुद्दा ठरल्याने पर्यावरणानुकुल गाड्या तयार व्हाव्यात, यासाठी अनेक प्रयत्न आजवर झाले. मात्र केवळ धूर कमी होण्यापेक्षा कार्बन उत्सर्जनच झालेच नाही तर? हे शक्य असणारी हायड्रोजन गाडीच येऊ घातली आहे.पर्यावरणानुकुल ‘युरो’ व आता ‘भारत-४’ श्रेणीतील इंजिनांच्या निर्मितीची सक्ती कंपन्यांवर करण्यात आली आहे. पण तरीही पारंपरिक इंधनाच्या गाड्या काही प्रमाणात तरी प्रदूषण करतात. यामुळेच अशा इंधनालाच पर्याय निर्माण झाला तर. हा प्रयत्न आॅटो एक्स्पोमध्ये होंडा कार्सने वेगळ्या तंत्रज्ञानाद्वारे केला आहे. होंडाने क्लॅरिटी फ्युएल सेल श्रेणीत सादर केलेली ‘एफसीव्ही’ गाडी भविष्यातील कार ठरेल. ही गाडी पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रीक बॅटरीवरही चालणारी नाही. त्या गाडीचे इंधन हायड्रोजन आहे. हायड्रोजन हे इंधन गाडीला लागणारी वीज तयार करते, त्यावर गाडी धावताच, उत्सर्जनाच्या रूपात पाणी बाहेर पडते.अशी गाडी जपान व अमेरिकेत ग्राहकांकडे आहे. ही गाडी भारतात येण्यासाठी हायड्रोजनची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यासाठी सक्षम धोरणांची गरज असेल.इथेनॉलवर बाइकआता चक्क इथेनॉलवर धावणारी बाइक येऊ घातली. इथेनॉलमधील ३५ टक्के आॅक्सिजन हे इंधनाच्या रूपात काम करेल. त्यातून बाइकमधून होणाºया नायट्रोजन आॅक्साइडचे उत्सर्जन कमी होईल, असे हे तंत्र टीव्हीएसने विकसित केले. ही बाइक १२९ किमी वेगाने धावू शकेल.पॉवरट्रेन्स इंजिनेवाहनाचा जीव इंजिनात असतो. गाडी आतून वा बाहेरून आधुनिक केली. परंतु इंजिन जुने असून चालत होत नाही. यासाठीच ‘पॉवरट्रेन्स’ इंजिने येत आहेत. ३० टक्के इंधन क्षमता वाढणारे हे तंत्रज्ञान ग्रीव्हज् कॉटनने आणले. ३० कार, आॅटो उत्पादकांना या इंजिनांचा पुरवठा करू, असे कंपनीचे सीईओ नागेश बसवनहळ्ळी म्हणाले.हाच सर्वोत्तम उपाय ‘पेट्रोल, डिझेल गाड्यांना इलेक्ट्रीक बॅटरीचा पर्याय असल्याचे बोलले जाते. मात्र ही बॅटरी चार्ज करण्यासाठी जी वीज लागते, ती वीज तयार करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतच असतं. यामुळे प्रदूषणमुक्तीचे अंतिम ध्येय कसे पूर्ण होणार? हे सारे काही टाळण्यासाठी हायड्रोजन हा सर्वोत्तम पर्याय आहे.’ -जनेश्वर सेन, वरिष्ठ उपाध्यक्ष, होंडा कार्स
आॅटो एक्स्पोत पर्यावरणानुकुल गाड्यांचा बोलबाला; देश कार्बन मुक्ततेकडे नेण्यासाठी वाहन उद्योगाचाही प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:45 AM