गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेली फोक्सवॅगन Taigun एसयूव्हीने (Volkswagen Taigun) गेल्या महिन्यात भारतामध्ये 1 वर्ष पूर्ण केले आहे. याप्रसंगी कंपनीने या गाडीची अॅनिव्हर्सरी अॅडिशन लॉन्च केली होती. लॉन्चनंतर आपण कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे 28,000 युनिट्स विकल्याचेही कंपनीने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीची ही एसयूव्ही एकूण 45,000 लोकांनी बूक केली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या एसयूव्हीचे नुकतेच क्रॅश टेस्ट करण्यात आले. यात ही एसयूव्ही देशातील सर्वात सुरक्षित एसयूवी ठरली आहे.
काय आहे किंमत -VW Taigun ची किंमत 11.56 लाख रुपयांपासून ते 18.71 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. ही कार डायनेमिक लाइन आणि परफॉर्मन्स लाइनमध्ये उपलब्ध आहे. फॉक्सवॅगन च्या या गाडीची फाईट प्रामुख्याने Hyundai Creta, Toyota Hyryder, Maruti Grand Vitara, Kia Seltos, आणि Skoda Kushaq सारख्या कार सोबत आहे.
फॉक्सवॅगन Taigun मध्ये दोन प्रकारचे टर्बो पेट्रोल इंजिन आहेत. पहिले इंजिन 1.0 लिटर (115PS आणि 178Nm), तर दुसरे 1.5 लिटरचे (150PS आणि 250Nm) आहे. हे दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी सलग्न आहेत. छोट्या इंजिनसह 6-स्पीड टार्क कन्व्हर्टर आणि मोठ्या इंजिनसह 7-स्पीड डीसीटीचे गिअरबॉक्स ऑप्शन आहे.
सेफ्टीत 5 स्टार -क्रॅश टेस्ट करणारी इंटरनॅशनल एजन्सी ग्लोबल एनसीएपीने (Global NCAP) Taigun ला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग दिली आहे. या कारने अडल्ट आणि चाइल्ट सेफ्टी दोन्हीतही 5 स्टार रेटिंग मिळवली आहे. याच बरोबर, सेफ कारच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळवणारी Taigun ही कंपनीची भारतातील पहिली कार ठरली आहे.