महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने केप टाऊनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आपल्या ग्लोबल FutureScape इव्हेंटमध्ये Mahindra Thar.e अर्थात थारच्या इलेक्ट्र्रिक व्हर्जनचे कन्सेप्ट मॉडल सादर केले. हे थारचे 5-डोर व्हर्जन आहे, जिच्या ICE व्हर्जनची वाट पाहिली जात आहे. Thar.e बोर्न इलेक्ट्रिक रेन्जचा भाग म्हणून डेव्हलप केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. अर्थात, हे सध्याच्या ICE व्हर्जनचे (रेगुलर पेट्रोल-डीजल) इलेक्ट्रिक व्हर्जन नसेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे नव्याने तयार केली जात आहे. हिच्यावर कंपनीचा नवा लोगोही दिसून येईल.कशी आहे Mahindra Thar.e - कंपनीने Mahindra Thar.e ला अत्यंत आकर्षक आणि फ्यूचरिस्टिक डिझाइन दिले आहे. हिला स्क्वेअर शेपमध्ये स्टायलिश LED हेडलॅम्पसह राउंड-ऑफ कार्नर आणि समोरच्या बाजूला ग्लॉसी अपराइट नोज देण्यात आले आहे. समोरच्या बाजूला देण्यात आलेले स्टील बम्पर या सेयूव्हीला जबरदस्त लूक देतात. तसेच स्क्वेअर्ड-आऊटचे व्हील आर्क आणि नवे अलॉय व्हील हिच्या साइड प्रोफाईलला जबरदस्त बनवतात. मागील बाजूस एक स्पेअर व्हील आणि स्क्वेअर LED टेललॅम्प जेण्यात येत आहे.
थार इलेक्ट्रिकचे इंटीरिअर - Mahindra Thar.e मध्ये एक मोठे ट्चस्क्रीन इंफोटेमेंट सिस्टिम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि नवे स्टेअरिंग व्हील देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने हिच्या इंटेरिअरसंदर्भात फारशी माहिती दिलेली नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही नवी महिंद्रा थार इलेक्ट्रिक नव्या INGLO P1 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, यामुळे एसयूव्हीला चांगला ग्राउंड क्लिअरन्ससह बेस्ट ऑफ-रोडिंग कॅपिसिटी मिळेल.
केव्हा होणार लॉन्च - कंपनीने महिंद्रा थार इलेक्ट्रिकच्या लॉन्चसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारीच माहिती दिलेली नाही. मात्र कंपनीचा नवा इलेक्ट्रिक व्हेइकल प्लांट पुढील वर्षात मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यानुसार एक अंदाज लावला जाऊ शकतो की, ही कार पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत अथवा 2025 मध्ये लॉन्च होऊ शकते. मात्र, यासंदर्भात ठोस काहीही सांगणे अवघड आहे.