देशातील आघाडीची दुचाकी वाहन उत्पादक कंपनी Bajaj Auto नं आपली नवी बाईक बजाज CT110X भारतीय बाजारात लाँच केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि जबरदस्त इंजिन असलेल्या बाईकची किंमत फार कमी आहे. नव्या बाईक कंपनीची CT110 या बाईकच्या तुलनेत 1612 रूपयांनी जास्त आहे. कंपनीनं या बाईकला नवा लूक दिला आहे. तसंच ही बाईक CT110 ची रिग्ड व्हर्जन असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीनं यात काही बदल करत त्याची बिल्ड क्वालिटी अधिक चांगली केली आहे. त्यामुळे ही बाईक CT110 पेक्षा वेगळी जाणवते. याशिवाय या बाईकमध्ये राऊंड हेडलँपसोबत छोटा फलाईट स्क्रिन, LED डे टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त टॅक पॅड्स, आकर्षक मडगार्ड, क्रॅश गार्ड आणि मागील बाजूला एक कॅरिअरही देण्यात आलं आहे. हे कॅरिअर ७ किलोपर्यंत वजन घेऊ शकतं.
काय आहे खास ?CT110X मध्ये पूर्वीप्रमाणेच इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. जे रेग्युलर मॉडेलमध्येही मिळतं. तसंच यामध्ये 115CC क्षमतेच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 8 bhp पॉवर आणि 10Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड गिअर बॉक्ससह येतं. या बाईकची किंमत 55,494 रुपये एक्स शोरूम दिल्ली इतकी आहे.
कंपनीनं CT110X ही बाईक एकूण चार ड्युअल टोन पेंट स्कीमसह बाजारात आणली आहे. याणध्ये ब्लॅक सोबत ब्लू, रेड सोबत ब्लॅक, ग्रिनसोबत गोल्ड आणि रेड कलर सामील आहे. खराब रस्त्यांवरही ही बाईक चांगली स्टेबिलिटी आणि कंट्रोल देईल असा दावा कंपनीनं केला आहे.