काही दिवसांपूर्वीच बजाजच्या मालकांनी ओला सारख्या कंपन्यांना खाऊन टाकणार असे वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेचच आता बजाज ऑटो नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांत ही स्कूटर भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
दररोज 50-60 किमी प्रवास करणाऱ्यांसाठी इलेक्ट्रीक स्कूटर परवडणारे साधन बनले आहे. सध्या भारतीय रस्त्यांवर बजाजची चेतक(Bajaj Chetak Electric), टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube), एथर 450एक्स (Ather 450X) या स्कूटर धावत आहेत. तर ओला एस १ (Ola S1 And Ola S1 Pro) आणि सिंपल वन (Simple One) च्या स्कूटर रस्त्यावर अद्याप यायच्या आहेत. अन्य काही स्टार्टअप कंपन्यांच्या स्कूटर रस्त्यावर धावत आहेत.
अशातच जुनी जाणती कंपनी बजाज नवीन इलेक्ट्रीक स्कूटर आणणार आहे. चेतक इलेक्ट्रीक स्कूटर ताफ्यात असताना बजाज रेंज विस्तार करणार आहे. कमी किंमतीत जास्त बॅटरी रेंज असलेली इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. यामुळे प्रसिद्ध कंपन्या अशा प्रकारच्या स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहेत. महत्वाचे म्हणजे सरकार बॅटरीचा खर्च उचलत आहे. यामुळे ग्राहकांना वेगवेगळी फिचर्स आणि क्वालिटी देण्याची जबाबदारी या कंपन्यांवर आहे. येत्या काही काळात हीरो, होंडासारख्या कंपन्यादेखील इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करतील.
बजाजची स्कूटर टेस्टिंगवेळी दिसलीबजाजची नवी इलेक्ट्रीक स्कूटर टेस्टिंगवेळी दिसली आहे. या स्कूटरची किंमत 1 लाखापेक्षा कमी असू शकते. ही स्कूटर खासकरून Ola S1 ला टक्कर देण्यासाठी तयार केली जात आहे. ही स्कूटर चेतकपेक्षा कमी रुंद आणि शार्प असेल. याची बॅटरी रेंजदेखील चांगली असू शकते. नववर्षाच्या सुरुवातीला ही स्कूटर लाँच होईल असे म्हटले जात आहे.