नवी दिल्ली : बजाज ऑटोने (Bajaj Auto) आपल्या कमी किमतीत जास्त मायलेज असलेल्या कम्युटर बाईक बजाज प्लॅटिना 110 (Bajaj Platina 110) चे नवीन व्हेरिएंट बाजारात लाँच केले आहे, ज्यामध्ये कंपनीने सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) बसविण्यात आले आहे.
Bajaj Platina 110 ABS Priceबजाज ऑटोने 72,224 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह प्लॅटिना 110 एबीएस बाजारात आणली आहे. बजाज प्लॅटिना 110 ही आपल्या सेगमेंटमधील एकमेव अशी बाईक आहे, ज्यामध्ये एबीएस सिस्टम देण्यात आली आहे.
Bajaj Platina 110 ABS Braking Systemबजाज ऑटोने प्लॅटिना 110 च्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक बसवले आहेत. या ब्रेकिंग सिस्टीममध्ये सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) जोडण्यात आली आहे.
Bajaj Platina 110 ABS Engineबजाज प्लॅटिना 110 एबीएस मध्ये कंपनीने सिंगल सिलिंडर 115.45 सीसी इंजिन दिले आहे, जे एअर-कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हे इंजिन 8.44 पीएस पॉवर आणि 9.81 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाईकमध्ये 17 इंची अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर लावण्यात आले आहेत.
Bajaj Platina 110 ABS Design and Featuresबजाज प्लॅटिना 110 एबीएसला अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि 11-लिटर इंधन टाकी, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि रिअर-व्ह्यू मिररसह इतर अनेक अपडेट मिळतात. बाईकमध्ये अपडेट केलेल्या हाय-टेक फीचर्सबद्दल सांगायचे तर, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, गियर गायडन्स फीचर, गियर पोझिशन इंडिकेटर, अँटी लॉक ब्रेकिंग (एबीएस) इंडिकेटर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Bajaj Platina 110 ABS Colorsबजाज ऑटोने (Bajaj Auto) या बाईकमध्ये नवीन फीचर्स आणि नवीन अपडेट्ससह चार नवीन कलर ऑप्शनही दिले आहेत, ज्यामध्ये पहिला कलर इबोनी ब्लॅक, दुसरा कलर ग्लॉस प्युटर ग्रे, तिसरा कलर कॉकटेल वाईन रेड आणि चौथा कलर ऑप्शन सॅफायर ब्लू आहे.
Bajaj Platina 110 ABS Mileageबजाज प्लॅटिना 110 एबीएसच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एक लिटर पेट्रोलवर 80 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. मात्र नवीन अपडेट इंजिननंतर या बाईकचे मायलेज वाढण्याची शक्यता आहे.