शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नवा अंदाज, नवे फिचर्स अन् स्वस्तात मस्त! Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:41 AM

Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition: बजाज ऑटो कंपनीनं आपली सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक असलेल्या बजाज पल्सरची Pulsar 125 Carbon Fiber Edition लॉन्च केली आहे.

Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition: बजाज ऑटो कंपनीनं आपली सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक असलेल्या बजाज पल्सरची Pulsar 125 Carbon Fiber Edition लॉन्च केली आहे. या नव्या एडिशनची बाइक दोन पर्यायात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात सिंगल सीट व्हर्जन आणि स्प्लिट सीट व्हर्जन पाहायला मिळणार आहे. नव्या पल्सरची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात. नवी बजाज पल्सर १२५ कार्बन एडिशन ब्लू आणि रेड अशा दोन रंगात लॉन्च करण्यात आली आहे. बाइकच्या डिझाइनमध्ये काही ग्राफिक्स देखील पाहायला मिळणार आहेत. बॉडी ग्राफिक्समध्ये हेडलॅम्प काऊल, फ्रंट फेंडर, फ्लुअर टँक, टेल सेक्शन आणि बेली पॅन इत्यादींचा समावेश असणार आहे. 

फीचर्ससस्पेंशनसाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रिअरमध्ये ड्युअर शॉक एब्जॉर्बर देण्यात आले आहेत. ब्रेकिंग परफॉर्मेंसबाबत बोलायचं झालं तर फ्रंट डिस्क ब्रेक 240mm आणि रिअरसाठी ड्रम ब्रेक युनिट मिळणार आहे. ही अत्याधुनिक बाइक ६ स्पोप अलॉय व्हील्ससह लॉन्च करण्यात आली आहे. 

बाइकच्या दोन्ही एडिशनमध्ये क्लासिक पल्सर डिझाइनसह मस्क्युलर फ्यूल टँक, सिंगल-पोड हेडलॅम्प, ब्लॅकआऊट साइड स्लंग एग्जॉस्ट आणि स्प्लिट ग्रॅब रेल्स देण्यात आले आहेत. तसंच बाइकमध्ये १२४.४ सीसीचं सिंगल-सिलेंडर, फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे की जे 8500rpm वर 11.64bhp आणि 6500rpm वर 10.8Nm चं पीक टॉर्क जनरेट करते. ही बाइक ५ स्पीड गीअरबॉक्ससह बाजारात दाखल करण्यात आली आहे. 

किंमत किती?सिंगल सीट व्हर्जनची किंमत ८९ हजार २५४ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर स्प्लिट सीट व्हर्जन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ९१ हजार ६४२ रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) खर्च करावे लागणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला Pulsar 125 Neon Edition देखील लॉन्च केली गेली होती. या बाइकची सुरुवातीची किंमत ८७ हजार १४९ रुपये इतकी आहे. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइल