शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

Bajaj Pulsar सीरिजची विशेष Dagger एडिशन झाली लाँच; जबरदस्त लूक, डिझाईनसह मिळतात 'हे' फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 5:16 PM

Bajaj Pulsar : पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत फीचर्स

ठळक मुद्देबाईकमध्ये देण्यात आलेत जबरदस्त ग्राफीक्सकाही दिवसांपूर्वी कंपनीनं लाँच केलं होतं आणखी एक व्हेरिअंट

भारतातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटो देशांतर्गत बाजारात आपल्या लोकप्रिय बाईक Bajaj Pulsar च्या रेंजचा विस्तार करताना दिसत आहे. नुकतीच कंपनीनं देशांतर्गत बाजारात Bjaja Pulsar NX ही बाईक लाँच केली होती. आता कंपनीनं आपली Dagger ही बाईक लाँच केली आहे. ही स्पेशल एडिशन Pulsar 150, Pulsar 180 आणि Pulsar 220F मध्ये सादर करण्यात आली आहे. Dagger मध्ये कंपनीनं केवळ ग्राफिक्स आणि पेंट स्किममध्ये बदल केले आहेत. याशिवाय मेकॅनिज्म यापूर्वीप्रमाणेच असेल. Bajaj Pulsar Dagger एडिशन कंपनीनं दोन पेंट स्किममध्ये लाँच केली आहे. यामध्ये पर्ल व्हाईट आणि सफायर ब्लू यांचा समावेश आहे. पर्ल व्हाईट कलरच्या बाईकमध्ये मडगार्ड आणि रिम्सवर रेड कलर हायलाईट देण्यात आले आहेत. ज्यामुळे या बाईकला स्पोर्टी लूक मिळतो. याशिवाय बॉडी पॅनल्सवर रेड आणि ब्लॅक कलरचे ग्राफिक्स देण्यात आले आहे. सफायर ब्लू कलरच्या बाईकवर मडगार्ज आणि रिम्सवर व्हाईट रंगाचे हायलाईट देण्यात आले आहे याशिवाय बॉडी पॅनलवर ब्लॅक व्हाईट ग्राफिक्स देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये पूर्वीप्रमाणेच 149.5cc क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 13.8 bhp ची पॉवर आणि 13.5Nm चा टॉर्क जनरेट करतं. सिंगल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1,01,818 रूपये आणि डबल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1,04,819 रूपये इतकी आहे.Pulsar 180, Pulsar 220F ची किंमतPulsar 180 मध्ये कंपनीनं सफायर ब्लूच्या ऐवजी व्होल्कॅनिक रेड आणि स्पार्कल ब्लू मॅट रंगांचा पर्याय दिला आहे. यामध्ये कंपनीनं 178.6cc क्षमतेचं इंजिन दिलं आहे. ते 16.8bjp पॉवर आणि 14.52Nm चा टॉर्क जनरेट करतं. याची किंमत 1,09,651 इतकी निश्चित करण्यात आली आहे. Pulsar 220F मध्ये कंपनीनं अन्य व्हेरिअंटप्रमाणेच हायलाईट्स आणि ग्राफिक्स दिले आहे. यात 220cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे, जे 20.1 bhp ची पॉवर आणि 18.55Nm चा टॉर्क जनरेट करतं. या बाईकची किंमत 1,28,520 इतकी निश्चित करण्यात आली आहे. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकIndiaभारत