नवी दिल्ली : बजाज ऑटोने आज Bajaj Pulsar N150 बाईक लाँच केली आहे. ही बाईक 1,17,677 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत कंपनीने आणली असून स्पोर्ट कम्युटर सेगमेंटमध्ये येते. लूकच्या बाबतीत ही बाईक तुम्हाला पल्सर N160 ची आठवण करून देईल, कारण बाईकची स्टायलिंग N160 सारखीच आहे. बाईकचे इंजिन देखील बजाज पल्सर P150 कडून घेतले आहे.
मायलेज काय देईल?बजाज पल्सर N150 च्या मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, ही बाईक सुमारे 45-50 किमी प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे. मात्र, जुनी पल्सर 150 देखील समान मायलेजचा दावा करते.
कलर ऑप्शनBajaj Pulsar N150 मध्ये 3 कलर ऑप्शनमध्ये देण्यात आले आहेत, ज्यात Racing Red, Ebony Black and Metallic Pearl White यांचा समावेश आहे.
बाईकमध्ये नवीन काय?Bajaj Pulsar N150 ला रुंद टायर, मोठी इंधन टाकी, मागील टायर हगर आणि आरामदायी राइडिंग ट्राइअँगल मिळतो. या बाईकचे वजन देखील N160 पेक्षा सात किलो कमी आहे. यामुळे तुम्हाला शहरातील प्रवासात खूप मदत मिळेल.
फीचर्सस्पोर्टी लूकमधील या बाईकमध्ये तुम्हाला एक मोठी इंधन टाकी मिळेल. स्पोर्ट्सबाईकला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळते, जे N160 वरून घेतलेले आहे, इंधन टाकीवर USB पोर्ट आणि स्पीडोमीटर आहे.
इंजिनBajaj Pulsar N150 त्याच 149.68cc, चार-स्ट्रोक इंजिनमधून पॉवर मिळवते, जे एकाच सिलिंडरसह येते. हे 14.5 पीएस पॉवर आणि 13.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकमध्ये पाच-स्पीड गिअरबॉक्स आहे.