नवी दिल्ली : सध्या भारतीय बाजारात ग्राहकांसाठी एंट्री लेव्हल 100 सीसी बाईक्स ते सुपरबाइक्स उपलब्ध आहेत. मात्र, ग्राहकांमध्ये 125 सीसी सेगमेंटच्या बाईक्सची मागणी सर्वाधिक आहे. आज आम्ही तुम्हाला 125 सीसी इंजिन ऑप्शनसह येणार्या काही स्पोर्टी लुक बाईस्कची माहिती देत आहोत.
TVS Raider ची किंमत आणि इंजिन डिटेल्सया टीव्हीएस बाईकची किंमत 93 हजार 719 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या बाइकमध्ये 124.8 cc चे सिंगल सिलिंडर एअर एंड ऑइल कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे, जे 11.2bhp पॉवर आणि 11.2Nm टॉर्क जनरेट करण्याचे काम करते.
Bajaj Pulsar 125 आणि NS125 चे इंजिन आणि किंमतभारतीय बाजारपेठेत बजाजच्या पल्सर बाईकचे नाव क्वचितच कोणाला माहित नसेल, ही बाईक 125 सीसी इंजिन ऑप्शनसह देखील उपलब्ध आहे. पल्सर 125 आणि पल्सर NS 125 या दोन्ही बाइक्समध्ये समान मेकॅनिकल स्पेसिफिकेशन वापरण्यात आले आहे, जसे की दोन्ही बाइकमध्ये 124.4 सीसी सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 11.8bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्ससह मिळेल. या बाईकची किंमत 89 हजार 254 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Honda SP125 ची किंमत आणि इंजिन संबंधित माहितीहोंडा बाईक अगदी वाजवी दरात मिळेल, या बाईकची किंमत 85 हजार 131 रुपयांपासून सुरू होते. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही बाईकची एक्स-शोरूम किंमत आहे. या बाईकमध्ये कंपनीने 123.94 सीसी इंजिन दिले आहे, जे 10.7bhp पॉवरसह 10.9Nm टॉर्क जनरेट करण्याचे काम करते. वर नमूद केलेल्या मॉडेल्सप्रमाणे तुम्हाला ही बाईक 5 स्पीड गिअरबॉक्स ऑप्शनसह देखील मिळेल.