नवी दिल्ली : बजाज ऑटोच्या (Bajaj Auto) नवीन पल्सरची (Pulsar) अनेक दिवसांपासून ग्राहक वाट पाहत होते. अखेर आज ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने बजाज पल्सर NS400 (Bajaj Pulsar NS400) रेन, ऑफ-रोड, रोड आणि स्पोर्ट अशा चार वेगवेगळ्या राइडिंग मोडसह लाँच केली आहे. तसेच, कंपनीने या बाईकची बुकिंगही लाँचसोबतच सुरू केली आहे.
Bajaj Pulsar NS400 मध्ये ग्राहकांना ड्युअल-चॅनल ABS आणि 5 स्टेप अॅडजस्टेबल लीव्हर्स देण्यात आले आहेत. बजाज पल्सरच्या या नवीन मॉडेलमध्ये अॅडव्हान्स फूल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, बजाज राइड कनेक्ट ॲपद्वारे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल्स अँड टेक्स्ट अलर्ट्स, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारखी अनेक फीचर्स आहेत.
किंमतबजाज ऑटोने पल्सरच्या या नवीन मॉडेलची किंमत 1 लाख 85 हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. विशेष म्हणजे या बाईकची प्रास्ताविक किंमत आहे. म्हणजेच मर्यादित कालावधीसाठी या किमतीत बाईक विकली जाईल. दरम्यान, कंपनी प्रास्ताविक किमतीत ही बाईक किती दिवसांपर्यंत विकणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
बुकिंगऑफिशियल लाँचिंगसोबत बजाजने ग्राहकांसाठी पल्सरच्या नवीन मॉडेलचे बुकिंगही सुरू केले आहे. जर तुम्हाला पल्सरचे नवीन मॉडेल घ्यायचे असेल तर तुम्ही 5,000 रुपये बुकिंग रक्कम भरून ही बाईक तुमच्या नावावर बुक करू शकता. बजाज ऑटोच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घराजवळील बजाज डीलरकडे जाऊनही बाईक बुक करू शकता.
टॉप स्पीड आणि इंजिनकंपनीने बजाज पल्सरचे नवीन मॉडेल 154 किमी प्रतितास या टॉप स्पीडसह बाजारात आणले आहे. या बाईकमध्ये 373 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे 8800rpm वर 40ps पॉवर जनरेट करते. याशिवाय, हे 6500rpm वर 35Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, ही बाईक तुम्हाला 6 स्पीड गिअरबॉक्ससह मिळेल.