बजाज ऑटो या दिग्गज टुव्हीलर कंपनीने भारतीय रस्त्यांवर पुन्हा एकदा पल्सरचे लाईट मॉडेल लाँच झाले आहे. कंपनीने Bajaj Pulsar 150P मध्ये काही बदल करून ती लाँच केली आहे. या बाईकचे दोन व्हेरिअंट उपलब्ध करण्यात आले आहेत.
बजाज पल्सर १५० पी च्या सिंगल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1.16 लाख रुपये आणि ट्विन डिस्क व्हेरिअंटची किंमत 1.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. F250 आणि N160 नंतर ही तिसरी पल्सर आहे, जी नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. Pulsar P150 मध्ये स्पोर्टी आणि शार्प डिझाईनचा वापर करण्यात आला आहे.
याशिवाय 3डी फ्रंट, ड्युअल कलर या बाईकला आणखी चांगला लुक देत आहे. सिंगल डिस्क व्हेरिअंट अपराईड स्टान्ससोबत येते. तर ट्विन डिस्कला स्पोर्टी स्टान्स देण्यात आला आहे. यामध्ये स्प्लीट सीट देण्यात आली आहे. Pulsar P150 मध्ये 149.68cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14.5 Ps ची ताकद आणि 13.5 Nm चा टॉर्क देते. बाईकचे वजन गेल्या मॉडेलच्या तुलनेत १० किलोने कमी करण्यात आले आहे. पॉवर-टू-वेट रेशो 11% वाढविण्यात आला आहे.
बजाज ऑटोच्या दाव्यानुसार 790mm ची सीट हाईट आणि मोनोशॉक सस्पेंशन बाईकचे रायडिंग चांगले बनविते. ही बाईक रेसिंग रेड, कॅरेबियन ब्लू, एबोनी ब्लॅक रेड, एबोनी ब्लॅक ब्लू आणि एबोनी ब्लॅक व्हाइट अशा पाच रंगांत आणण्यात आली आहे. सिंगल डिस्क वेरिएंटची किंमत 1,16,755 रुपये आणि ट्विन-डिस्क वेरिएंटची किंमत 1,19,757 अशी ठेवण्यात आली आहे. ही बाईक कोलकातामध्ये लाँच करण्यात आली असून देशभरात लवकरच लाँच केली जाईल.