मारुती सुझुकीने सीएनजीच्या आपल्या ताफ्यात आज तगड्या गाड्या उतरविल्या आहेत. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना सीएनजी त्यातलेत्यात दिलासा देणारा आहे. अशावेळी मारुतीने ग्राहकांना आणखी दोन कारमध्ये सीएनजीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये बलेनो आणि एक्सएल ६ आहे.
मारुतीने आज नेक्सा ब्रँडच्या दोन कार बलेनो सीएनजी आणि प्रीमियम MPV XL6 CNG व्हेरिंअंट लाँच केले आहे. Baleno CNG कारची सुरुवातीची किंमत 8.28 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर या कारचे झिटा (Zeta) व्हेरिअंट 9.21 लाख रुपयांना एक्सशोरुम मिळणार आहे.
याचबरोबर XL6 सीएनजीचे झिटा व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आले असून याची किंमत 12.24 लाख रुपये आहे. या तिन्ही व्हेरिअंटची किंमत पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा ९५ हजार रुपयांनी जास्त आहे. बलेनो सीएनजीचे मायलेज 30.61 किमी/किलो तर XL6 CNG चे मायलेज 26.32 किमी/किलोपर्यंत मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
बलेनो आणि एक्सएल ६ मध्ये 7 इंचाची स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, व्हॉईस असिस्टंस, सुजुकी कनेक्ट व सीएनजीसाठी खास स्क्रीन देण्यात आली आहे. एक्सएल ६ मध्ये क्रूज कंट्रोल, ४ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. मारुती लवकरच ब्रेझासुद्धा सीएनजीवर लाँच करणार आहे. बलेनो लाँच झाल्यावर आता टोयोटानेसुद्धा ग्लान्झा सीएनजीवर लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे.
ब्रेझा पेट्रोल मॅन्युअलची दिल्लीतील किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. सीएनजीवर चालणाऱ्या व्हेरियंटची किंमत सुमारे ७५,००० रुपये जास्त असण्याची शक्यता आहे. म्हणजे Brezza CNG MT ची किंमत 8.74 लाख-13.05 लाख दरम्यान असू शकते.