ऑटोमॅटीक कार चालविण्याचे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. सिटीमध्ये वाहतूक कोंडीत सारखे सारखे क्लच, एक्सिलेटर, गिअर बदलत बसावे लागते. यातून सुटका म्हणून तुम्ही ऑटोमॅटीक कार घेता. पण हीच ऑटोमॅटीक कार किंवा एकाच जागी बसणे मग ते ऑफिस असेल किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला हृदयविकाराचा झटका देखील देऊ शकते. कसे ते पहा आणि त्यावर उपाययोजना करा.
हृदयाचा त्रास नसला तरी ऑटोमॅटीक कार चालविल्याने तुम्हाला कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो. ऑटोमॅटीक कार चालविताना तुमचा डावा पाय बराच वेळ स्थिर असतो. त्याची काही हालचाल होत नाही, जी मॅन्युअल कारमध्ये होते. यामुळे या पायात डीव्हीटी (डीप व्हेन थ्रोम्बोसिस) होऊ शकतो. म्हणजेच बराच वेळ कार चालवत असाल तर तुमच्या पायात रक्ताच्या गाठी तयार होतात. हाच प्रकार तुम्ही बराच वेळ हालचाल न करता ऑफिसमध्ये किंवा घरी एकाच खुर्चीवर बसाल तरी देखील होऊ शकतो.
रक्त वर ढकलण्यासाठी पायामध्ये असंख्य सूक्ष्म झडपा असतात. पायच एकाच जागी स्थिर असल्याने तेथील रक्ताचे भिसरण थंडावते आणि या झडपा काम करणे थांबवतात. यामुळे तिथे रक्ताच्या गुठळ्या होतात. हे गुठळ्या झालेले रक्त हळूहळू पुढे हृदयात जाते आणि मग हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
अनेकांच्या बाबत अशा घटना घडलेल्या आहेत. केवळ अज्ञानातून आपण याचा शिकार होतो. ऑटोमॅटीक गाडी आरामासाठी ठीक आहे परंतू तीच जिवघेणी ठरू शकते. यासाठी कार्डिओलॉजिस्टनी काही उपाय सांगितलेले आहेत. ऑटो-गियर कारच्या चालकांनी एक-दोन तास गाडी चालविली की थांबावे. थोडे चालावे, पाय मोकळे करावेत. डाव्या पायातील रक्ताभिसरण नीट करावे. ऑफिसमध्ये तासंतास बसणाऱ्या लोकांनाही याचा धोका आहे. यामुळे त्यांनी देखील थोड्या थोड्या वेळाने उठून चालावे. जेणेकरून रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत आणि तुम्हाला चक्कर येणे, हृदयविकाराचा सौम्य झटका येणे असे काही होणार नाही.