शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तुम्हाला 'ही' सवय आहे? मग गाडी चालवताना सावधान! अपघात होण्याचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 5:22 AM

अमेरिकेमध्ये कमर्शिअल वाहनचालकांना परवाना देण्याअगोदर आणि दर दोन वर्षानंतर घोरण्याची/झोपाळूपणाची चाचणी दिली जाते. आपल्या देशात जर अशी काळजी घेतली तर अनेक अपघात निश्चितच टळतील. 

- डॉ. अभिजित देशपांडे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस (iissreports@gmail.com)घनश्याम सरोदे यांचे घोरणे आणि कामातली मरगळ एकदमच वाढल्याच्या कहाणीची सुरुवात गेल्या आठवड्यात आपण वाचली.  घोरण्यामुळे झोप खंडित होते, त्याने थकवा येतो, मग ‘आज करेसो कल, कल करेसो परसो!’ अशा तऱ्हेची टाळाटाळ  करण्याची प्रवृत्ती (प्रोकॅन्सटीनेशन) निर्माण होते. पटकन राग येतो. दिवसा झोप येत असल्याने फोकस ठेवणे कठीण जाते, स्मरणशक्ती कमी होते, अगदी औदासीन्यदेखील येऊ शकते. श्री. सरोदे यांचे तेच झाले होते!वारंवार मेंदू जेव्हा उठवतो त्या वेळेस कॉर्टिसॉल नामक हार्मोनचा स्त्राव होतो.  त्यामुळे पोटाभोवतीच्या चरबीचे प्रमाण वाढते. या शिवाय घेलीन या हार्मोनमुळे पिष्टमय पदार्थांची (भात, बटाटा, साखर इत्यादी) आवड निर्माण होते. परिणामी असे पदार्थ जास्त सेवनात येतात. सततच्या थकव्याने व्यायामाचे प्रमाण कमी होते. वाढलेल्या वजनामुळे गळ्याभोवतीची चरबी वाढते. गळ्याचा व्यास (डायामीटर) जितका कमी तितका तो कंप पावण्याची (घोरण्याची )आणि बंद होण्याची शक्यता जास्त!खंडित झोपेमुळे मेंदूच्या कार्यप्रवणतेवर परिणाम होतो. आपल्या मेंदूचा निर्णय घेण्याचा वेग आणि प्रतिक्षिप्त (रिफ्लेक्स) क्रिया किती पटकन होते हे मोजण्याचे तंत्रज्ञान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेसमध्ये उपलब्ध आहे. सरोदे यांची प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स )जवळ जवळ ५० मिलिसेकंदानी (१००० मिलिसेकंद = १ सेकंद) मंदावली होती. ०.०५ सेकंद हा ‘जीवन की मृत्यू?’ इतका फरक असू शकतो. गाडी ड्राइव्ह करत असताना वाहनचालकाचा रिफ्लेक्स ३० मिलीसेकंदाने चुकला तरी अपघात होऊ शकतो.  अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनात दारू खालोखाल झोपाळूपणा हे अपघाताचे प्रमुख कारण आहे हे सिद्ध झाले आहे. झोप कुठल्याही कारणाने कमी किंवा खंडित होते तेव्हा गॅम्बलिंग (जुगार) करायची प्रवृत्ती वाढते. ही प्रवृत्ती मोजण्याची पद्धतीही आमच्या संस्थेत आहे. अमेरिकेमध्ये कमर्शिअल वाहनचालकांना परवाना देण्याअगोदर आणि दर दोन वर्षानंतर घोरण्याची/झोपाळूपणाची चाचणी दिली जाते. आपल्या देशात जर अशी काळजी घेतली तर अनेक अपघात निश्चितच टळतील.