भारतीय बाजारपेठेत स्पेशियस आणि मोठ्या कार्सची बरीच मागणी असते. सद्यस्थितीत भारतीय बाजारपेठेत अशा अनेक कार्स उपलब्ध आहेत. परंतु फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी Renault नं आपल्या 7 सीटर कार Triber वर मोठा डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात कंपनी शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना या एमपीव्हीच्या खरेदीसाठी एक विशेष ऑफर देत आहे, ज्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात बचत करू शकता.नुकतीच कंपनीनं आपल्या Triber चं नवं फेसलिफ्ट मॉडेल बाजारात लाँच केलं होतं. नव्या अपडेट्स आल्यानंतर या कारची किंमतही वाढवण्यात आली होती. आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन क्षमता असलेल्या या MPV ची किंमत 5.30 लाख रूपयांपासून 7.82 लाख रूपये (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे. कंपनीनं या कारमध्ये तिसऱ्या रांगेत डिटॅचेबल सीटचा वापर केला आहे. ज्यात तुम्हाला गरज भासल्यास ती सीटही काढता येते. ही एमपीव्ही सिंगल पेट्रोल इंजिन आणि चार व्हेरिअंट्ससोबत बाजारात उपलब्ध आहे. कंपनीनं यात 1.0 लीटर क्षमतेचं 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 72hp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. मिळतात हे फीचर्सफीचर्सबद्दल सांगायचं झालं तर या MPV मध्ये प्रोजेक्टर हेडलँप, LED डे टाइम रनिंग लाईट्स, 8.0 इंचाचा ट्चस्क्रिन एन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही सिस्टम अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोद्वारे कनेक्ट केली जाऊ शकते. तसंच तिन्ही रो मध्ये एसी वेंट्स, कुल्ड सेंटर बॉक्स, किलेस एंट्री, पुश बटन स्टॉर्ट/स्टॉप, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो आणि रियर वॉश वायपर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत. काय आहे ऑफर?कंपनी या कारच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही मॉडेल्सवर ऑफर देत आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिेलेल्या माहितीनुसार नव्या कारवर 30000 रूपये तर जुन्या मॉडेलवर 55000 रूपयांपर्यंतची बचत करू शकता. यामध्ये मागील मॉडेलवर 25 हजारांचा तर नव्या मॉडेलवरील 15 हजारांचा डिस्काऊंटही सामील आहे.
ग्रामीण भागांसाठी विशेष ऑफर या ऑफर्सशिवाय कंपनी काही व्हेरिअंट्सवर 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट्स आणि 10 हजारांपर्यंत लॉयल्टी बोन देते. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठीही विशेष ऑफर्स देण्यात येत आहे. याअंतर्गता ग्राम पंचायतीचे सदस्य, सरपंच आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त 5 हजार रूपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागात ऑफरदरम्यान कॉर्पोरेट डिस्काऊंट लागू होणार नाही.