Benelli India ने भारतात Benelli Imperiale 400 चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. कंपनीने याची एक्स-शोरुम किंमत 1.89 लाख रुपये ठेवली आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वीच लाँच केलेल्या मोटरसायकलपेक्षा आताच्या मॉडेलची किंमत 10000 रुपयांनी कमी ठेवली आहे. किंमत कमी करण्यामागे स्थानिक स्तरावर असेम्बलिंग आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचे कारण आहे. (Benelli has introduced the 2021 Imperiale 400 in the Indian market.)
TVS iQube इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि रेंज...
भारतीय बाजारात बेनेली (benelli) Imperiale 400 चा थेट मुकाबला हा Royal Enfield Meteor 350 आणि Honda H'Ness CB 350 सारख्या मोटारसायकलशी आहे. नवीन Royal Enfield Meteor 350 ची सुरुवातीची किंमत 1.78 लाख रुपये आहे. तर Honda H'Ness CB 350 ची सुरुवातीची किंमत ही 1.87 लाख रुपये आहे.
Benelli Imperiale 400 मध्ये 374 सीसीचे सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 आरपीएमवर 20.71 bhp ची ताकद, 3,500 आरपीएमवर 29 Nm चा टॉर्क देते. गिअरबॉक्स ५ स्पीडचा देण्यात आला आहे. बाईकच्या लूकमध्ये कोणताही बदल केलेला नाहीय. 2021 Imperiale 400 मध्ये ग्राहकांना मॉडर्न-क्लासिक डिजाइनचा राऊंड हेडलाईट, टिअर ड्रॉप शेप्ड फ्युअल टँक देण्यात आला आहे.
MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स
बाईकच्या पुढच्या चाकाला 41 मिलीमीटरचा टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे प्रिलोड अॅडजस्टेबर ड्युअल शॉक सस्पेशन देण्यात आले आहे. पुढे 19 इंच आणि मागे 18 इंचाचे टायर देण्यात आले आहेत. दोन्ही चाकांना डिस्क ब्रेकसोबत स्टँडर्ड ड्युअल एबीएस देण्यात आले आहेत. Benelli Imperiale 400 ला आता दोन वर्षांची अनलिमिटेड वॉरंटी देण्यात आली आहे. याशिवाय़ ग्राहकांकडे आता आणखी दोन वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी खरेदी करण्याचा पर्याय असणार आहे. ग्राहकांना 24x7 रोडसाईड असिस्टन्स मिळणार आहे.
नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर'