शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 6:08 PM

Flying Taxi Service : फ्लाइंग टॅक्सी जलद आणि पर्यावरणपूरक बनवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे.

Flying Taxi Service : बंगळुरु : कर्नाटकातील बंगळुरू शहर हे आयटी हब म्हणून ओळखले जाते. तसेच, या शहरात वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. मात्र, आता या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता शहरात फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस सुरू होणार असून, त्यामुळे तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सरला एव्हिएशन आणि बंगलुरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) संयुक्तपणे शहरात इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सुरू करणार आहेत. ही फ्लाइंग टॅक्सी शहरातील प्रमुख ठिकाणं आणि विमानतळादरम्यान चालविली जाऊ शकते. ही फ्लाइंग टॅक्सी सुरू झाल्यास लोकांचा प्रवासातील बराच वेळ वाचू शकेल, असे म्हटले जात आहे.

रिपोर्टनुसार, या पार्टनरशिप अंतर्गत अॅडव्हान्स एअर मोबिलिटी सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित केले आहे. या फ्लाइंग टॅक्सी केवळ हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत उडणार नाही, तर प्रदूषणही करणार नाहीत. फ्लाइंग टॅक्सी जलद आणि पर्यावरणपूरक बनवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे.

फ्लाइंग टॅक्सीसाठी किती असेल भाडे?फ्लाइंग टॅक्सीने प्रवास केल्यास बराच वेळ वाचणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने इंदिरानगर ते विमानतळापर्यंत प्रवास केला तर त्याला रस्त्यानं जवळपास दीड तास लागतात. फ्लाइंग टॅक्सीने हाच प्रवास केल्यास फक्त ५ मिनिटांत पूर्ण करता येईल. रिपोर्ट्सनुसार, जर ही फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस सुरू झाली तर जवळपास २० मिनिटांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती १७०० रुपये खर्च येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिससाठी किती वेळ लागेल?फ्लाइंग टॅक्सीचा हा प्रोजेक्ट अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या फ्लाइंग टॅक्सीचा प्रोटोटाइप अजून बनवायचा आहे. तसेच, नियामक मान्यता मिळण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. BIAL च्या मते, ही फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस बंगळुरूमध्ये सुरू होण्यासाठी जवळपास दोन ते तीन वर्षे लागू शकतात.

टॅग्स :AutomobileवाहनTaxiटॅक्सीKarnatakकर्नाटकAutomobile Industryवाहन उद्योग