शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Petrol वर चालणाऱ्या स्कूटर्सना असं बदला Electric Scooters मध्ये; कमी खर्चात होणार जास्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 6:14 PM

Electric Vehicle : पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या दरम्यान काही कंपन्या स्कूटरला इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय घेऊन आल्या आहेत.

ठळक मुद्दे पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या दरम्यान काही कंपन्या स्कूटरला इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय घेऊन आल्या आहेत.

जर तुमच्याकडे कोणतीही जुनी पेट्रोलवर (Petrol) चालणारी स्कूटर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आता अनेक ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांना (Electric Vehicles) पसंती देत आहेत. भारतातही इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. दरम्यान, बंगळुरूमधील काही स्टार्टअप कंपन्यांनी जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतर करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यासाठीची येणारा खर्चही कमी आहे.

बंगळुरूमध्ये राईड शेअरिंग सेवा पुरवणाऱ्या बाऊन्स या स्टार्टअप कंपनीनं अशीच एक योजना सुरू केली आहे. कंपनी कोणत्याही जुन्या पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटरमध्ये इलेक्ट्रीक मोटर आणि बॅटरी (रेट्रोफिट किट) लावून इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतरित करते. यासाठी कंपनी फक्त 20 हजार रुपये आकारत आहे.

किती मिळणार रेंज?“आतापर्यंत आम्ही 1000 हून अधिक जुन्या स्कूटरचं इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतर केलं आहे. कंपनी या स्कूटर मालकांसाठी सेवा केंद्रे देखील उघडत आहे. या स्कूटरमध्ये येणाऱ्या बॅटरी किटसह, एकदा स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यावर स्कूटर ६५ किमी पर्यंत चालवता येते. हे किट ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे प्रमाणित आहे," अशी माहिती बाउन्सचे सह-संस्थापक विवेकानंद हलकेरे यांनी दिली.

पेट्रोल, इलेक्ट्रीक दोन्ही पर्यायबाउन्स या कंपनीनंतर आता अनेक कंपन्या असं किट घेऊन आल्या आहेत, ज्यात Etrio आणि Meladath ऑटोकम्पोनन्ट सामिल आहे. रिपोर्टनुसार Meladath एक असं Ezee Hybrid किट मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे ज्याच्या वापरानं जुनी स्कूटर तुम्ही हायब्रिड स्कूटर किंवा इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बदलू शकता. त्यामुळे गरज भासल्यास तुम्हाला ती इलेक्ट्रीक किंवा पेट्रोल दोन्ही पैकी कोणत्याही एका मोडवर चालवता येते.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेडBengaluruबेंगळूरPetrolपेट्रोल