गाव असो की शहर, प्रवास छोटा असो की लांब... हल्ली मोठ्या संख्येने लोक दुचाकीचा वापर करतात. पण, ज्या वेगाने पेट्रोलचे दर वाढत आहेत, ते पाहता लोकांची चिंता वाढली आहे. भारतातील पायाभूत सुविधा पाहता इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे सध्या फारसे फायदेशीर दिसत नाही. अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने लिटरमागे 100 रुपये पार केले आहेत.
अशा परिस्थितीत केवळ कारच नाही तर बाईक वापरणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या संख्येने भारतीय ग्राहक शानदार मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहेत. त्यामुळे आम्ही अशा 10 बाईक्सची यादी घेऊन आलो आहोत, ज्या शानदार मायलेज सुद्धा देतात आणि त्या फारशा महागही नाहीत.
सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या 10 बाईक्स
- Bajaj Platina 100 : या बाईकची किंमत 63,130 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 72 kmpl पर्यंत आहे.
- TVS Sport : या बाईकची किंमत 63,950 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. या बाईकचे मायलेज 70 kmpl पर्यंत आहे.
- Bajaj Platina 110 : या बाईकची किंमत 69,216 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 70 kmpl पर्यंत आहे.
- Bajaj CT 110: या बाईकची किंमत 66,298 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 70 kmpl पर्यंत आहे.
- TVS Star City Plus: या बाईकची किंमत 72,305 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 68 kmpl पर्यंत आहे.
- Honda SP 125: या बाईकची किंमत 82,486 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. या बाईकचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.
- Hero HF Deluxe: या बाईकची किंमत 59,890 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. याचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.
- TVS Radeon: या बाईकची किंमत 59,925 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. या बाईकचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.
- Honda CD 110 Dream: या बाईकची किंमत 70,315 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.
- Hero Splendor Plus: या बाईकची किंमत 72,728 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. बाईकचे मायलेज 60 kmpl पर्यंत आहे.