एकतर पेट्रोलची किंमत कमी होणे किंवा तुमची स्कूटर जास्त मायलेज देऊ लागणे, या दोन प्रकारे स्कूटर चालवण्याचा खर्च कमी होऊ शकतो. आता पेट्रोलचे दर कमी होतील की नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. परंतु असे नक्कीच म्हणता येईल की अशा अनेक स्कूटर बाजारात आहेत, ज्या उत्कृष्ट मायलेज देतात. यापैकी कोणतीही स्कूटर तुम्ही घरी आणली तर स्कूटर चालवण्याचा खर्च कमी होईल. आम्ही तुम्हाला देशातील सर्वाधिक मायलेज असलेल्या 5 स्वस्त स्कूटर्सबद्दल माहिती देत आहोत.
1. YAMAHA FASCINO HYBRID 125यामाहा FASCINO HYBRID 125 मध्ये 125cc एअर-कूल्ड इंजिन येते. यासह माइल्ड-हायब्रिड सेटअप मिळते. त्यामुळे ते जवळपास 68 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. त्याची पॉवरट्रेन 8.2PS/10.3Nm आउटपुट देते. स्कूटरची किंमत सुमारे 76,600-87,830 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
2. YAMAHA RAYZR 125यामाहा RAYZR 125 ही एक जास्त स्पोर्टियर स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 125cc इंजिन आहे. यासोबत एक माइल्ड-हायब्रिड सेटअप देण्यात आला आहे. त्यामुळे ते सुमारे 68 kmpl मायलेज देण्यासही सक्षम आहे. या स्कूटरची किंमत सुमारे 80,730-90,130 रुपये (एक्स-शोरूम) आहे. याचे पाच व्हेरिएंट आहेत.
3. SUZUKI ACCESS 125सुझुकी ACCESS 125 मध्ये 124cc, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. ही स्कूटर जवळपास 64 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. स्कूटरची किंमत सुमारे 77,600-87,200 रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्कूटरच्या फ्यूल टँकची क्षमता 5-लिटर आहे.
4. TVS JUPITERटीव्हीएस JUPITER मध्ये 110cc इंजिन आहे. यासह intelliGO आइडल स्टार्ट/स्टॉप फंक्शन दिले आहे. हे प्रति लिटर पेट्रोलवर जवळपाल 60 किमी मायलेज देऊ शकते. या स्कूटरची किंमत सुमारे 70-85 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे.
5. HONDA ACTIVA 6Gहोंडा ACTIVA 6G ची किंमत 76,587 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या स्कूटरमध्ये 109.51cc, सिंगल-सिलिंडर, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे, जे 55 kmpl पर्यंत मायलेज देते.