भारतात एसयूव्ही कार प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहेत. यातही सब-4 मीटर SUV ची विक्री सर्वाधिक आहे. जर आपणही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, मात्र आपले बजेट 10 लाख रुपयांपर्यंतच असेल, तर आज आम्ही आपल्यासाठी अशा 10 SUV ची लिस्ट घेऊन आलो आहेत, ज्यांची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे, यात महिंद्रा थारचाही समावेश आहे. थार RWD ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 9.99 लाख रुपये एवढी आहे.
या आहेत 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या 10 एसयूव्ही -- Tata Punch (किंमत- 6 लाख रुपये ते 9.4 लाख रुपयांपर्यंत)- Tata Nexon (किंमत- 7.80 लाख रुपये ते 14.35 लाख रुपयांपर्यंत)- Maruti Brezza (किंमत- 8.19 लाख रुपये ते 13.88 लाख रुपयांपर्यंत)- Hyundai Venue (किंमत- 7.68 लाख रुपये ते 13.11 लाख रुपयांपर्यंत) - Kia Sonet (किंमत- 7.69 लाख रुपये ते 14.39 लाख रुपयांपर्यंत) - Renault Kiger (किंमत- 6.50 लाख रुपये ते 11.23 लाख रुपयांपर्यंत) - Nissan Magnite (किंमत- 5.97 लाख रुपये ते 10.94 लाख रुपयांपर्यंत) - Mahindra XUV300 (किंमत- 8.41 लाख रुपये ते 14.07 लाख रुपयांपर्यंत) - Mahindra Bolero (किंमत- 9.78 लाख रुपये ते 10.79 लाख रुपयांपर्यंत)- Mahindra Thar (किंमत- 9.99 लाख रुपये ते 16.49 लाख रुपयांपर्यंत)
या कारला मिळतेय सर्वाधिक पसंती - या सर्वांमध्ये मारुती सुझुकी ब्रेझाची सर्वाधिक विक्री होत आहे. मार्च 2023 मध्ये मारुती सुझुकी ब्रेझा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली. कंपनीने हिच्या 16,227 युनिट्सची विक्री केली आहे. तर मार्च 2022 मध्ये 12,439 युनिट्सची विक्री केली. अर्थात हिच्या विक्रीत जवळपास 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. याच बरोबर, याच बरोबर ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली कारही ठरली आहे.