नवी दिल्ली : गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी बुलडोझर असल्याचे सांगत 2030 पर्यंत पेट्रोल, डिझेलची वाहने बंद करणार असल्याचे वक्तव्य केले होते. पर्यावरणासाठी ही घोषणा योग्य असली तरीही इलेक्ट्रीक वाहनांच्या तंत्रज्ञानासाठी भारताला दुसऱ्या देशांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे भारतरत्न पुरस्कार विजेते वैज्ञानिक सीएनआर राव यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
सध्याच्या वाहनांमध्ये लिथिअम आयनच्या बॅटरी वापरण्यात येत आहेत. या बॅटरी चीनद्वारे पुरविल्या जात आहेत. सरकारने चीनच्या बहकाव्यात येऊ नये असा इशारा त्यांनी दिला आहे. राव यांच्या म्हणण्यानुसार लिथिअम आयन बॅटरीच्या जागी सोडियम किंवा मॅग्नेशिअम बॅटरी वापरावी. कारण लिथिअम आयनची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे आपल्याला चीनवर मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. बॅटरी मिळत नसल्याने याचा परिणाम त्यांच्या किंमती वाढण्यावर होणार आहे.
हेलियमही होणार नष्टलवकरच सोडियमच्या बॅटरी बाजारात येतील. सध्या सर्वत्र लिथिअम कोबाल्ट बॅटरी वापरल्या जात आहेत. पण लिथिअमचे साठे आहेत कुठे? ते केवळ एका फॅक्टरीतून येत आहे. तर कोबाल्ट कांगोतून येते. मात्र, कांगोवर चीनने ताबा मिळविला आहे. चीनकडे अविश्वसनिय दूरदृष्टी आहे. अर्धा अधिक ऑफ्रिका चीनच्य नियंत्रणात आहे. हेलियम देखील लवकरच संपणार आहे.