येत्या एप्रिलपासून बीएस४ची वाहने विक्रीसाठी बंद होणार आहेत. यामुळे सर्वच कंपन्यांनी नवीन बीएस ६ ची वाहने बाजारात आणली आहेत. पण Honda Activa 6G, Activa 125 आणि Honda Dio च्या BS 6 मॉडेलना कंपनीने माघारी बोलावले आहे.
ही मॉडेल १४ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान उत्पादित करण्यात आली आहेत. सध्यातरी किची स्कूटर माघारी बोलवल्या आहेत याचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
स्कूटरमध्ये ऑईल लिकेज आणि आणि ब्रेकिंगमध्य समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्राहकांना कोणतीही समस्या होऊ नये यासाठी कंपनी लवकरात लवकर हा फॉल्ट दूर करणार आहे. ही समस्या कंपनी मोफत दुरूस्त करून देणार आहे. तसेच स्पेअर पार्टही विनाशुल्क बदलून देणार आहे. या समस्येमुळे कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
कंपनीने ग्राहकांना ईमेल आणि एसएमएस पाठवून स्कूटरची तपासणी करण्यास सांगितले आहे. याची माहिती कंपनीने अधिकृत वेबसाईट https://www.honda2wheelersindia.com/services/campaign यावर दिली आहे. यामध्ये व्हेईकल आयडेंटिफिकेशन नंबर टाकून तुमच्या वरील तीनपैकी कोणत्याही मॉडेलमध्ये समस्या आहे की नाही हे समजणार आहे.
आधीही अशाच समस्या आल्याने कंपनीने वाहनचालकांना अशी सुविधा देऊ केली होती.