देशात कार चालकांच्या तुलनेत दुचाकी चालकांची संख्या मोठी आहे. आपल्या देशात दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर बाइक्स आणि स्कूटर्सची खरेदी-विक्री होते. शहरापासून ते अगदी गाव खेड्यांपर्यंत लोक प्रवासासाठी बाइक अथवा स्कूटरचा वापर करतात. पण, दुचाकी वाहनांचीपेट्रोल टाकी छोटी असल्याने त्यात सातत्याने पेट्रोल टाकावे लागते. यामुळे अनेक वेळा रस्त्यातच पेट्रोल संपते आणि चालकावर बाइक ढकलण्याची वेळ येते. मात्र, अशी वेळ आपल्यावर आलीच तर आपण पेट्रोल पंपापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकता, यासंदर्भात आज आम्ही आपल्याला खास टिप्स सांगणार आहोत.
चोकचा वापर -अधिकांश बाइक्समध्ये चोक सिस्टम दिलेली असते. यात काही प्रमाणावर पेट्रोल असते. फार नसले, तरी यातील पेट्रोलच्या सहाय्याने आपण पेट्रोल संपल्यानंतरही बाइक सुरू करू शकता आणि जवळपासच्या एखाद्या पेट्रोल पंपावर जाऊ शकता. पण महत्वाचे म्हणजे, आधुनिक बाइक्समध्ये ही सिस्टिम देण्यात आलेली नाही.
बाइक साइड स्टँडवर लावा -बाइक मधील पेट्रोल संपल्यानंतरही, बाइकच्या टाकीत काही प्रमाणावर पेट्रोल असते. पण ते इंजिनपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळी आपण आपली बाइक काही मिनिटे साइड स्टँडवर लावा. यामुळे हे पेट्रोल इंजिनपर्यंत येईल आणि बाइक स्टार्ट होईल.
फ्यूअल टँकमध्ये प्रेशर तयार करा -आपण या शेवटच्या ट्रिकचाही वापर करू शकता. जर आपल्या बाइकमधील पेट्रोल रस्त्यातच संपले, तर आपल्या बाइकची पेट्रोल टाकी ओपन करून त्यात फुंकर मारा आणि ती बंद करा. यामुळे बाइकमधील फ्यूअल इंजिनपर्यंत जाण्यास मदत होते आणि बाइक सुरू होते.